दुसऱ्या दिवशीही इर्शाळवाडीतील सर्च ऑपरेशन सुरू,चिखल ,धुके ,पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे मदत कामात व्यत्यय --
हनुमंत मोरे
वावोशी / खोपोली : २१ जुलै,
रात्रीच्या अंधारात कोसळलेल्या डोंगराने आपल्या कवेत घेतलेल्या इर्शाळवाडीतील अनेक घरे उध्वस्त होत यामध्ये राहणारी माणसे,प्राणी,पक्षी हे सर्व मातीमध्ये गाडले गेल्यामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत १०६ लोक जिवंत असल्याचा पुरावा जिल्हा प्रशासनाला मिळाला होता. तर या दुर्दैवी घटनेत १६ लोकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.आज सकाळी सात वाजता हे सर्च ऑपरेशन सुरू होणार होते.मात्र सतत पडणारा पाऊस व दाट धुके यामुळे हे सर्च ऑपरेशन आठ वाजता सुरू करण्यात आले.
वेगवेगळ्या सामाजिक संस्था ह्या एन.डी. आर.एफ.च्या जवानांच्या सोबतीने मातीच्या मलम्याखाली दडलेल्या लोकांना शोधण्याचे काम करत होत्या.त्यांच्या प्रयत्नाला आज दुपारी दोन शव शोधण्यात यश मिळाले असले तरी या परिसरात आता दुर्गंधी पसरू लागली आहे.त्यामुळे हे सर्च ऑपरेशन पुढे किती वेळ चालू राहील याबाबत काही सांगता येत नाही.
खालापूरचे तहसीलदार आयुब आंबोळी, खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार,खोपोलीतून नुकतेच बदली होऊन गेलेले पोलीस निरीक्षक शिरिष पवार,आरोग्य यंत्रणा,एनडीआरएफ घ्या जवानांसह
अन्य सामाजिक संस्था या कामात जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली मदत करीत आहेत.इर्शाळगडाच्या खालच्या बाजूचा कडा वेगळा होता हा कडा इर्शाळवाडीतील दोन्ही बाजूंची घरे घेऊन खाली आला.या वाडीतील मुलीचं सात ते आठ घरे तशीच राहिली मात्र दोन्ही बाजूंची घरे रात्रीच्या अंधारात गायब झाल्याचे पहायला मिळते.
आज सकाळी जसे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले तशी लोकांची गर्दी हे पाहण्यासाठी वाढू लागली होती.मात्र योग्य पध्दतीने नियोजन केल्यामुळे किंवा बचावलेल्या घराकडे बघ्यांनी पाठविले जात नसल्याने काम करणाऱ्यांना त्यांचा अडथळा निर्माण होत नव्हता.शोधकार्य करणाऱ्या जवानांना चिखल व पावसाचा व्यत्यय येत होता खरा मात्र हे सर्व जवान आपले काम प्रामाणिकपणे करतांना दिसून आले.
0 Comments