शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांची आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 मालमत्ता करा मधील तक्रारी सोडविण्यासाठी मुदत वाढ  देण्याबाबत शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांची आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी



संजय कदम 
पनवेल : २७ जुलै,

           पनवेल महानगरपालिकेकडून लावण्यात आलेल्या मालमत्ता करा संदर्भात नागरिकांच्या भरपूर तक्रारी आणि अडी अडचणी आहेत. ता तक्रारी सोडवण्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिका चे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.
      पनवेल महानगरपालिकेकडून लावण्यात आलेल्या मालमत्ता करा संदर्भात नागरिकांच्या भरपूर तक्रारी आणि अडी अडचणी आहेत. त्या संबंधाने महापालिकेकडून वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आलेली होती. त्यात १२ मुद्दे लिहून नागरिकांना हरकत अर्ज देण्यासाठी २४ जुलै ते २८ जुलै अशी पाच दिवस मुदत देण्यात आलेले होती. परंतु नागरिकांना सदरची पेपर नोटीस वाचनामध्ये यायला वेळ लागला, तसेच गेले सहा ते सात दिवस महापालिका हद्दीत अतिवृष्टी होत आहे. 
            त्यामुळे नागरिकांना हरकत घेण्यासाठी कमी दिवस मिळत आहेत. त्यामुळे हरकत अर्ज स्वीकारण्याची मुदत आणखी एक आठवड्याने वाढविण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर