स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटी बैठकीत कार्यकर्त्यांना टी शर्ट व छत्र्यांचे वाटप


 स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटी बैठकीत कार्यकर्त्यांना टी शर्ट व छत्र्यांचे वाटप


संजय कदम 
पनवेल : २४ जुलै, 

           स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वतीने महाराष्ट्राच्या कोर कमिटीची बैठक शासकीय निवासस्थान पनवेल येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी पक्षाचे अध्यक्ष सागर संसारे, पक्षाचे युवा नेते अनिकेत संसारे उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांना टी शर्ट व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.  
                   महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाळाराम जाधव, मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित हिरवे, पक्षाचे संघटक भगवान गरूड,  मुंबईचे नेते  विजय जाधव,  महाराष्ट्र सचिव अशोक वाघमारे पक्षाचे नेते सुमित संसारे  मराठवाड्याचे पक्षाचे नेते व नगरसेवक विजय साळवे अनेक मान्यवर नेत्यांसह महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्याचे व तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष या बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पनवेलचे डॉक्टर गिरीश गुणे व उद्योगपती राहुल पाटील यांच्या हस्ते उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना टी शर्ट व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. 
            यावेळी महेश साळुंखे यांनी येणाऱ्या आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका यांच्या विषयी पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून ते पुढील आपली रणनीती  ठरविणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांचा वाढदिवस हा 8 ऑगस्ट रोजी होत आहे. हा वाढदिवसाच्या विविध कार्यक्रमांनी संपन्न करण्यात येणार आहे. या बैठकीला सुमारे २०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर