विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठी सकाळची पहीली खोपोली - देवन्हावे बस सेवा सुरू करा - ॲड.जयेश तावडे यांची मागणी,विदयार्थी व ग्रामस्थांनी दिले खोपोलीच्या मुख्याधिकारी यांना निवेदन

 


विदयार्थ्यांच्या शिक्षणासाठी सकाळची पहीली खोपोली - देवन्हावे बस सेवा सुरू करा - ॲड.जयेश तावडे यांची मागणी,विदयार्थी व ग्रामस्थांनी दिले खोपोलीच्या मुख्याधिकारी यांना निवेदन 


समाधान दिसले 
खालापूर १७ जुलै,

              खोपोली येथे शालेय - महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाण्याकरीता खोपोली नगर परिषदेकडून देवन्हावे येथे गेली ५०  वर्षे पुर्विपासून सुरु असणारी सकाळची पहीली बस सेवा काही महीन्यांपूर्वी संबंधित ठेकेदार यांचेकडुन बंद करण्यात आल्याने विदयार्थ्यांसह पालकाना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने विदयार्थी, पालक व देवन्हावे गावकरी नगरपालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारा विरोधात संताप व्यक्त करीत असताना विदयार्थी व पालकाच्या समस्येची दखल घेत देवन्हावे येथील अभी युवा ग्रुपच्या वतीने ॲड.जयेश तावडे व अन्य सदस्यानी विदयार्थ्यांसह १७  जुलै रोजी खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दूरे यांची भेट घेत खोपोली ते देवन्हावे सकाळची ६ वाजून १०  मिनीटाची बस सेवा लवकर सुरू करा अशी मागणी केली आहे, 
              तर ही बस सेवा लवकर सुरू न केल्यास संबधितांच्या विरोधात तिव्र आंदोलन करुन आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा ॲड.जयेश तावडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी अभि युवा ग्रुपचे ॲड.जयेश तावडे,,अतिश पाटील, गौरव बारस्कर, राज पाटील, अँड भगवान लाले, साहिल पाटील, सोहम चौधरी, कुणाल पाटील, दिवेश पाटील, सुमित बोर्ले, श्रवण गायकवाड,सुजल कुऱ्हाडे, भूषण भागवत आधी उपस्थित होते.
               तर खोपोली - देवन्हावे येथे सुरू असणारी सकाळची ६ वाजून १०  मिनीटाची बस सेवा नगरपालिकेने दिलेल्या ठेकेदाराने कोरोना लॉकडाऊन पासून बंद केलेली बस सेवा अद्याप बंद असल्याने यांचा नाहक त्रास विदयार्थ्यांना करावा लागत आहे.
तसेच गेल्या काही दिवसापासून शाळा व कॉलेज सुरु झाल्याने खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील विदयार्थी हे शिकण्यासाठी खोपोली शहरात जात असताना तालुक्यातील देवन्हावे गावामधील विदयार्थी ही मोठया सख्येने शिक्षणासाठी खोपोलीत ये - जा करीत असताना खोपोली - देवन्हावे अशी सकाळची ६ वाजून १०  मिनीटाची बस सेवा बंद झाल्याने विदयार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे, 
             तर ही बस बंद झाल्याने विदयार्थ्यांना वेळेत शाळेत अथवा महाविद्यालयात पोहचता येत नाही, त्यामुळे विदयार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे, व हे नुकसान कधिही भरून न येणारे आहे. तसेच शाळेत व महाविद्यालयात काहीं विदयार्थी यांना वेळेत पोहचण्यासाठी नाईलाजास्तव रिक्षाने खोपोलीकडे प्रवास करावा लागतो, परंतु विदयार्थ्यांना रिक्षाचे भाडे हे सर्वसामान्य वर्गातील विदयार्थी व पालकांना न परवडणारे असून बहुसंख्य विदयार्थी हे आपली कुंटूबाची अर्थीक परिस्थीती बेताची असल्या कारणाने पैसे वाचविण्यासाठी कोणत्याही अपरिचीत व्यक्तीच्या दुचाकी वाहन चालकाला हात करुन प्रवासासाठी विनवणी करतात,
              अपरिचीत दुचाकी चालक विदयार्थ्यांना आपल्या वाहनावर बसुन पुढील प्रवास करतात तर काही दुचाकी चालक विदयार्थ्यांना घेवुन स्टंटबाजी करीत अति वेगाने वाहन चालवीत असल्याने विदयार्थ्यांचा हा प्रवास असुरक्षित असुन हा दुचाकीवरचा प्रवास भविष्यात मोठया अपघाताला आमंत्रण देउ शकतो, त्यामुळे ही विदयार्थी व पालकाच्या समोर मोठी समस्या उभी राहील्याने विदयार्थी - पालकाच्या समस्येची दखल घेत देवन्हावे येथील अभी युवा ग्रुपच्या वतीने ॲड.जयेश तावडे व अन्य सदस्यानी विदयार्थ्यांसह १७  जुलै रोजी खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दूरे यांची भेट घेत खोपोली ते देवन्हावे सकाळची६ वाजून १०  मिनीटाची बस सेवा लवकर सुरू करा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


चौकट -

           खोपोली नगरपरिषद प्रशासन  व संबंधित ठेकेदार यांनी या बंद असलेल्या बस सेवेचे गांभिर्य न घेतल्यास भविष्यात होणा-या अपघाताला व परिणामाला सर्वस्वी संबधित ठेकेदार व नगरपरिषद खोपोली चे अधिकारी जबाबदार राहतिल. तसेच ही सेवा पुर्ववत चालू न केल्यास संबधितांच्या विरोधात तिव्र आंदोलन करुन आमरण उपोषण केले जाईल.
ॲड.जयेश तावडे - ग्रामस्थ

Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे