स्थानिक भूमिपुत्रांना विमानतळसेवा प्रशिक्षण देण्यासाठी पनवेल काँग्रेसचा पुढाकार,जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पनवेल काँग्रेस भवन येथे तरुणांना विमानतळ रोजगाराचे प्रशिक्षण
संजय कदम
पनवेल : १५ जुलै,
पनवेलमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येऊन पनवेलच्या समृद्धीत कमालीची भर पडणार आहे. या अनुषंगाने येथील स्थानिक भूमिपुत्रांना विमानतळ प्रकल्पात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून आज (शनिवार दि.१५ जुलै) शहरातील काँग्रेस भवन येथे पनवेल काँग्रेसच्यावतीने युवकांसाठी विमानतळसेवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पनवेलमधील व परिसरातील असंख्य तरुणांचा प्रतिसाद लाभला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी आर पाटील यांच्या संकल्पनेतून,पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या पुढाकाराने व बोल्ड विंग प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये एअरहॉस्टेस व विमानतळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तंत्रज्ञान व कौशल्य विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश यादव, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील जेष्ठ नेते जी आर पाटील, नंदराज मुंगाजी, महिला निरीक्षक चंद्रकला नायडू, वंदना सातपुते, निर्मला म्हात्रे, शशिकला सिंह, माया अहिरे, मल्लिनाथ गायकवाड, लतीफ शेख, आबा खेर, वैभव पाटील,वसंत काठावले,
मुसद्दीक मोडक, स्वप्निल पवार , मंजुळा कातकरी,अमित दवे ,अमित लोखंडे, कांती गंगर, संतोष चिखळकर, सुदर्शन रायते, सुधीर मोरे, सुनिता माली, शीला घोरपडे, नरेश कुमारी नेहमी, नीता शनाय, जयवंत देशमुख, लतीफ नलखंडे, ललिता सोनावणे, अरुण ठाकूर, विलास माघाडे, राजू बहिरा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या भारतात १३१ विमानतळे असून २०२५ पर्यंत २२५ विमानतळांची निर्मिती होणार आहे. तर महाराष्ट्रात लवकरच तीन नवीन विमानतळे होणार आहेत. काँग्रेसच्या पुढाकारामुळे पुढील काळात याच प्रशिक्षणातील मुले विमानतळावर नोकरीला दिसतील असा विश्वास जी आर पाटील यांनी व्यक्त केला. तर उच्चवर्गीयांसमवेत मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांनी देखील या क्षेत्रात यावे. कारण या क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी आहेत. विमानतळावर काम करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून याकरिता येथील तरुणांनी पुढाकाराने विमानतळसेवा प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन 'बोल्ड विंग'च्या सीईओ मिनाक्षी रामटेके व मॅनेजिंग डायरेक्टर अंजू गुप्ता यांनी व्यक्त केले.
शिबिरानंतर सामाजिक कार्यकर्ते रमजान शेख यांच्यासह ५० कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यासह इलियास शेख यांच्या समर्थकांनी व खांदा गावातील भाजपचे गणपत म्हात्रे यांनी सुद्धा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच दिपाली ढोले यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोट:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात येथील स्थानिक तरुणांना प्राधान्याने नोकऱ्या मिळाव्यात अशी पनवेल काँग्रेसची आग्रही मागणी आहे. विमानतळ सेवेसाठी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. तरुणांनी देखील कौशल्य प्रशिक्षण घ्यावे जेणेकरून याठिकाणी निर्माण होणाऱ्या विमानतळावर रोजगाराच्या विविध संधी मिळतील. यादृष्टीने काँग्रेसच्या माध्यमातून पनवेलमध्ये रोजगार प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्याचा मानस आहे.
- सुदाम पाटील, जिल्हाध्यक्ष पनवेल काँग्रेस
0 Comments