नविन पनवेल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहरसमन्वयकपदी शिवाजीराव पालांडे यांची नियुक्ती


 नविन पनवेल   शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहरसमन्वयकपदी शिवाजीराव पालांडे यांची नियुक्ती


संजय कदम
पनवेल दि १५, जुलै,  

         शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांच्या हस्ते पक्षाच्या नविन पनवेल शहरसमन्वयकपदी  शिवाजीराव पालांडे यांची नियुक्ती पत्र देत नियुक्ती करण्यात आली . 
                  यावेळी बोलताना  शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत यांनी सांगितले की ,शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते ,संपर्क नेते कोकण विभाग सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून  संघटनात्मक कार्य करतांना ,संघटनेच्या हिताची जपणूक करणे ,संघटनेच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणे संघटनेला व संघटनेच्या प्रतिष्ठेला आपणामुळे डाग लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे . 
         यावेळी  नवीन पनवेल शहर प्रमुख यतिन देशमुख , उपमहानगर प्रमुख किरण तावदारे , विभाग प्रमुख किरण सोनावणे तसेच सिद्धेश बने उपस्थित होते  .   

Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे