ग्रूप ग्राम पंचायत कराडे खुर्द येथे पिल्लाई कॉलेज च्या विद्यार्थांनी केली वृक्ष लागवड

 


पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
कराडे : ११ जुलै, 
           
              शाळेय शिक्षण घेत असतांना पुस्तकामध्ये पर्यावरण विषय हा आवर्जून असतो.मात्र विद्यार्थ्यांना स्वता अनुभवता यावे या विचारांतून पिल्लेय कॉलेज मोहपाडा च्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वृक्ष देवून लागवड आणी त्यांचे संवर्धन कसे करायचे यांचे मार्गदर्शन करण्यात आले.यासाठी ग्रूप ग्राम पंचायत कराडे खुर्द या परिसरात पिंपळ,निलगिरी,कडुलिंब,साग,गुलमोहर ,तान्हन,करंज,अर्जुन,रिठा,कुंतजिवा,निंबारा,रेनट्री,वड,साग,बदाम, सफकर्णी असे शेकडो हून अधिक वृक्ष लागवड या परिसरात विद्यार्थ्यांनी केली.

                 वृक्ष लागवड आणी संवर्धन ही आजच्या काळाची गरज निर्माण,झाली आहे. या वृक्षापासून फळे,सावली,तसेच जमिनिची धुप थांबविणे,शुद्ध हवा असे अनेक गुण या वृक्षामध्ये असतात.शिवाय काही वृक्ष हे वन औषधी म्हणून त्यांचा वापर सुद्धा केला जात असतो. असे अनेक गुणकारी वृक्ष आपल्या सभोवताली असणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांना सुद्धा या वृक्षांची ओळख आणी त्यांची माहिती उपलब्ध व्हवी या उद्दात विचारांतून हे कार्यक्रम हाती घेण्यात आले.
            यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी हातात,फावडे, कुदळ घेवून घड्डे पाडून या मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.आपण पर्यावरणांचा समतोल आबाधित राहण्यासाठी वृक्ष लागवड करीत असल्यामुळे मनस्वी आनंद होत असल्यांचे विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
         यावेळी पिल्लाई कॉलेज मोहपाडा  येथिल मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी तसेच सरपंच भारती चितळे, उप सरपंच प्रमिला योगेश पाटील,ग्रामसेवक - निवूर्ती आंधळे,सदस्या, मिनल ठोंबरे,माधुरी चितळे,संतोष म्हात्रे ,यशस्री मुरकुटे,मुकेश पाटील,नितेश करंदे.रेवती भोईर नलिनी करंदे,तसेच ग्रामस्थ म्हणून धनाजी ठोबरे,प्रशांत चितळे ,राजेश सोनवले  नंदू वेध्,योगेश पाटील,योगेश मुरकुटे,रवी भोईर,मा.सरपंच विजय मुरकुटे किरण मळी, रवी चितळे अदि उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे