सारसई माडभुवन वाडीला दरड पडण्याचा धोका, ईर्शाळवाडीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी केली पाहणी
दत्तात्रय शेडगे
खोपोली : २३ जुलै
पनवेल तालुक्यातील आपटा ग्राम पंचायत हद्दीतील सारसई माडभुवन ही आदिवासी ठाकूर वस्ती असून येथे शंभर कुटुंब या ठिकाणी राहत आहेत, मात्र ही वस्ती अतिदुर्गम भागात असल्याने डोंगराच्या पायथ्याशी बसलेली आहे, त्यामुळे येथेही भविष्यात दरड कोसलण्याची दाट शक्यता या ग्रामस्थांकडून वर्तविली जात आहे,
डोंगराच्या पायथ्याशी हे माडभुवन वस्ती वसलेले असून येथील ग्रामस्थ मोलमजुरी करीर आहेत, मात्र तरीही येथील या आदिवासींना रस्ता ,लाईट ,पाणी या समस्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते गेल्या वर्षी येथील जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी सतत पाठ पुरावा करत वनविभागाची परवानगी घेऊन रस्ता आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे .परंतु नुकताच झालेल्या ईर्शाळ वाडीच्या दुर्घटनेचा धस्का येथील आदिवासी लोकांनी घेतला आहे .
या वस्ती लगत असलेल्या डोंगराला गेल्या वर्षापासून पावसाळ्यात तडे जात आहेत ,डोंगर कधीही खचून ही दरड वाडीत येऊ शकते अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे ,याचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन आमदार महेश बालदी साहेब यांनी तातडीने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जि. प.सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी प्रत्यक्ष डोंगरावर जाऊन डोंगराला पडलेल्या भेगांची पाहणी केली आणि ग्रामस्थांना जागृत राहण्याच्या सूचना दिल्या तसेच पनवेल तहसीलदारांना संपर्क करून तातडीने पाहणी करून पुढील उपाय योजना करण्याची विनंती केली आहे ,जेणेकरून ईर्शाळवाडीची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे,
यावेळी त्यांच्या सोबत माजी सरपंच दत्ता पाटील ,सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत,धर्मेंद्र भोईर,सुशील ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लेंडे, माजी सदस्य बुधाजी दोरे,शनिवार उघडा,गोरख लेंडे ,विजय लेंडे वाडीतील अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
0 Comments