माणुसकीचे नाते जपणारा ॲड.रमेश जनार्दन पाटील
!! वाढदिवस शुभचिंतन !!
हनुमंत मोरे
वावोशी / खोपोली : १९ जुलै
आज माझे जीवलग मित्र ॲड.रमेश जनार्दन पाटील यांचा वाढदिवस असल्याने त्यांचे अनेक जण नक्कीच अभिष्टचिंतन करणार यात वाद नाही, तत्पूर्वी मी त्यांचे मनस्वी अभिष्टचिंतन करीत आहे.त्यांनी आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करतांना भावकी,गावकी व समस्त ग्रामस्थांच्या त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची ताकद त्यांच्या कतृत्वात यावी यासाठी मी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो.माझ्या मित्राला निरोगी, सशक्त आणि उदंड आयुष्य दे.....
गोरठण बुद्रुक गावातील ॲड.रमेश जनार्दन पाटील यांचा आज वाढदिवस आहे. एका श्रुजनशिल कुटुंबात जन्माला आलेले ॲड.रमेश पाटील हे लहान पणा पासूनच हुशार आणि दुरदृष्टीने विचार करणारे आहेत.आपल्या कुटुंबाची आणि समाजातील प्रत्येक घटकाची काळजी असलेल्या ॲड.रमेश पाटील यांनी आपल्या आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत,कष्ट घेतले असल्याचे आपण पाहत आहोत.
यशाची प्रत्येक पायरी ते तितक्याच चोखंदळपणे पादक्रांत करीत आज ते समाजातील एक आदर्श व्यक्ति बणण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत.कोणी वंदावे नाहीतर कोणी निंदावे...त्याकडे कानाडोळा करून आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शांत मनाने मार्गक्रमण करणे हेच ॲड.रमेश पाटील यांचे नित्याचे काम बणले आहे.ते आज एक उत्तम वकील बणले आहेत.आपल्या आई-वडिलांचे आशिर्वाद,भावंडांचे सहकार्य,धर्मपत्नीची साथ, गावातील थोरा मोठ्यांचे आशिर्वाद आणि मित्रांचे सहकार्य आपणास इथपर्यंत पोहचण्यासाठी महत्वाचे त्यांचे म्हणणे असले तरी ते आपल्या यशा मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्वांचा आवर्जून उल्लेख करतांना दिसतात.
वाढदिवसानिमित्ताने ॲड.रमेश पाटील आज नवीन वर्षात पाऊल टाकत असतांनाच त्यांनी आपला पूर्व इतिहास विसरल्या चे दिसत नाही याचा मला सार्थ अभिमान आहे. एका गरीब कुटुंबातून मार्गक्रमण करत यशाच्या बुलंद शिखरावर आरूढ झालेल्या व्यक्तिला आपले मागचे दिवस विसरण्याची सवय असते परंतु आपल्या आयुष्यात जडघडणीतील सर्व गोष्टी आजही ॲड.रमेश पाटील यांनी विसरलेल्या दिसत नाहीत हेच त्याच्या यशाचे खरे गमक असल्याचे दिसून येते.खूप काही सांगण्यासारखे आहे परंतु आज नको म्हणूनच त्यांस वाढदिवसानिमित्ताने मी व माझ्या कुटुंबाच्या वतीने मनस्वी शुभेच्छा देत आहे.
हनुमंत मोरे आणि परिवार
परखंदे
0 Comments