शिवगर्जना मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम,विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य समवेत श्रमदान
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
कर्जत / नालदे १८ जुलै,
शिवगर्जना मित्र मंडळ विविध उपक्रम राबवित असतांना सामाजिक बांधिलकी जोपासण्यांचा प्रयत्न करीत आहे.जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व मित्र मंडळी यांनी एकत्र ऐवून स्थापन केलेल्या शिवगर्जना मित्र मंडळा चे सदस्य दर महिन्याला वर्गांनी काढून तालुक्यातील असलेल्या रायगड जिल्हा परिषदेतील शाळांना विविध शैक्षणिक साहित्य त्याच बरोबर त्या शाळेसाठी श्रमदान खावू वाटप असे विविध उपक्रम राबवित असतात.हे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानांचे हास्य झळकावे, शिवाय त्यांच्या शिक्षणाला मदत व्हावी या उद्दात हेतूने हे उपक्रम हे मंडळ करीत आहे.
नुकताच राजिप शाळा नालदे येथे विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य समवेत क्रिडा साहित्य म्हणून ढोल, लेझिम, लगोरी,धोरी उड्या,कॅरम,चेंडू अदि साहित्य देण्यात आले.खेळामुळे शरिरिक कसरत होते.शिवाय बुद्धीचा विकास ही होत असतो.त्याच बरोबर शाळेला रंग देणे असे उपक्रम हाती घेतले जात असतात.मुरबाड तालुक्यातील घागुर्ली शाळा,कर्जत मधील काळ्याचीवाडी, नेवाळी, धामात अदिवासीवाडी , गुढवणवाडी व इतर अनेक शाळेला भेटवस्तू देवून श्रमदान करून शाळेचा सर्वागीण विकास कसा होइल या कडे सातत्याने शाळेच्या संपर्कात राहून उपक्रम राबविले जात असते.
ज्ञानेश्वर ( भाऊ ) म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणी शिवगर्जना मित्र मंडळ चे अध्यक्ष गाडे सर यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असतात.यावेळी नितीन गाडे,संजय थोरात,विलास चव्हाण,पंढरीनाथ पाटील, इले सर,संतोष हेमाडे,रवी पाटील,शंकर थोटे,हरिभाऊ दहिफळे,दत्ता ढोले,प्रवीण पाटील, यांच्यासह सौ.लीनाताई म्हसे नाजुकाताई म्हसे,प्रणालीताई म्हसे,हिराताई म्हसे,सारिकाताई जाधव, जयश्री ताई मराडे, सुनिताताई म्हसे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत गीत तसेच पुष्प देवून स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक नालदे शाळेचे मुख्याध्यापक पुटगे सर यांनी केले.
0 Comments