पंचायत समिती पनवेल तर्फे बागेची वाडीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 


 पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
पनवेल : ६ जुलै,

                   गेल्या काही दिवसांपूर्वी पंचायत समिती पनवेल चे गट विकास अधिकारी संजय भोये यांनी या वाडीला सहजच भेट दिली .यावेळी येथील ग्रामस्थांनी वाडीत वृक्षारोपण करण्यात यावे अशी मागणी केली होती,या ग्रामस्थांच्या मागणीची बी.डी.ओ पूर्तता करून सर्व कुटुंबांना ५८ हापूस आंब्याच्या कलमांची रोपे आणि १०० कागदी फुलांची रोपे देण्यात आली .      

                                  या रोपांची  लागवड पंचायत समिती चे विस्तार अधिकारी अविनाश घरत,विश्वास म्हात्रे,कृषी विस्तार अधिकारी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विस्तार अधिकारी अविनाश घरत यांनी काही महिन्यात या वाडीसाठी पन्नास खुर्च्या सार्वजनिक शौचालय आणि सुशोभीकरणासाठी विविध फुलझाडांची लागवड करून बागेची वाडी नावाप्रमाणे तयार करून लवकरच जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या वाडीला भेट देतील अशी आशा आपल्या मनोगतात यावेळी व्यक्त केल. 


                 यावेळी अर्चना ट्रस्ट मुंबई चे सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत ,परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला पाटील,सह सचिव पायल आंब्रे,दत्ता शिरसाठ तसेच दामू वाघे,कृष्णा वाघे,मोतीराम वाघे,कानु वाघे,संतोष वाघे आणि मोठ्या संख्येने वाडीतील महिला पुरुष उपस्थित होते.उपस्थित सर्व आदिवासी ग्रामस्थांनी सर्वच्या सर्व झाडे आम्ही जगवू असा निर्धार केला आणि बी.डी.ओ.संजय भोये यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव