पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
टेंभरी : ७ जुलै,
ग्रूप ग्राम पंचायत टेंभरी यांच्या माध्यमातून नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा शिवाय पर्यावरणाचा समतोल अबाधित राहावे यासाठी शेवग्यांचे १६०० वृक्ष लागवड आणी वाटप करण्यात आले.या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला रोजगार उपलब्ध होणार आहे.शिवाय या शेवग्यांच्या शेंगा तसेच पाला, यांना खूप मागणी असल्यामुळे साहजिकच या पासून मोठ्याप्रमाणावर प्रत्येकाला आर्थिक उत्पन्न समवेत रोजच्या जेवणामध्ये वापर करु शकतो.शिवाय यांना मागणी असल्यामुळे हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
ग्रूप ग्राम पंचायत टेंभरी या परिसरात सारंग,टेंभरी,आसरोटी,वयाल,कोपरी तसेचअदिवासी वाड्या अंगणवाडी,शाळा,अश्या विविध ठिकाणी या वृक्षांचे वाटप करण्यात आले.हे वृक्ष घेतांना प्रत्येक ग्रामस्थ यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.वृक्ष आपणांस उत्पन्न बरोबर पर्यावरणाचा समतोल अबाधित राहण्यांस मदत होते.शिवाय अनियमित पाऊस सुका दुष्काळ या सर्व बाबीचा आभ्यास करून थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला.
यावेळी ग्रूप ग्राम पंचायत टेंभरी सरपंच रमेश गायकवाड,उप सरपंच - अंजना भोईर,ग्रामसेवक - गोकुळदास राठोड,सदस्या - दर्शना फाटे,प्रतिभा भोईर,अर्पणा पवार,निताली बामणे,आशा कातकरी,स्वपना ठोंबरे,सदस्य - रोशन गायकवाड,जनार्दन मुकणे,निखिल पाटील,निकेश ठोंबरे संगणक परिचालक - प्रगती मोरे
0 Comments