कै.हभप भाऊ पाटील यांचे निधन
हनुमंत मोरे
खोपोली/ वावोशी २१ जुलै,
बारवई येथील कै.हभप भाऊ बुधाजी पाटील यांचे आजारपणाने निधन झाले.मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते.कै.हभप भाऊ बुधाजी पाटील यांच्या मृत्यूची बातमी परिसरात पसरताच नागरिकांनी वारा,पावसाची तमा न बाळगता त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व वारकरी संप्रदायातील मंडळींनी बारवई येथील राहत्या घरी धाव घेतली.त्यांच्यावर बारवई गावच्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सर्वंपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.कै.भाऊ बुधाजी पाटील यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि.२८ जुलै रोजी उध्दर रामेश्वर येथे करण्याचे योजिले आहे.तर उत्तरकार्य सोमवार दि.३१जुलै रोजी बारवई येथील राहत्या घरी करण्यात येणार आहेत.कै.हभप भाऊ बुधाजी पाटील यांच्या मृत्यूने बारवई गावात शोककळा पसरली असून जुलै अखेरपर्यंत सायंकाळी ग्रॅथवाचन तसेच दि.३० जुलै रोजी रात्री ७ ते ९ या वेळात हभप काशिनाथ महाराज लबडे यांचे किर्तन तर सोमवार सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत हभप भरत महाराज पवार यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.
कै.हभप भाऊ बुधाजी पाटील यांनी गावचे पोलिस पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच, कोंकण वारकरी संप्रदाय पदाधिकारी आदी पदे भुषविली आहेत.पंढरपुर,आळंदी पायी दिंडी ते न चुकता करायचे.जिल्यातील वारकरी सप्ताहात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा.शांत ,सरल व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांनाच हवेहवेसे वाटायचे.गोरगरीबांवर अन्यायाला वाचा फोडणारे खरे भाऊ म्हणजे भाऊ बुधाजी पाटील अशी त्यांची जिल्ह्यात ओळख होती.त्यांच्या पश्च्यात्य दोन मुले,सुना,नातवंडे,भाऊ असा परिवार आहे.
0 Comments