संजय कदम पनवेल दि.०२ जुलै,
बँकिंग उद्योगातील अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने डॉक्टर आणि सी.ए. दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. आपल्या ग्राहकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले परम कर्तव्य आहे असे समजून बँकेने डॉक्टर्स व सी.ए.दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली. बँक ऑफ महाराष्ट्राच्या, नवी मुंबई झोन अंतर्गत नवीन पनवेल शाखेने आपले सन्माननीय डॉक्टर्स ग्राहक नील हॉस्पिटलचे संचालक, डॉ.पंढरीनाथ नील, डॉ.शुभदा नील यांना त्यांच्या क्लिनिकला भेट देऊन ते देत असलेल्या सेवेबद्दल त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली. डॉक्टर्स जे आपला जीव धोक्यात टाकून मानवांचे बहुमूल्यप्राण वाचवीत आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. तसेच बँकेने डॉक्टर हेच पृथ्वी तलावरील खरे हिरो आहेत अशा भावना व्यक्त केल्या. तसेच कार्तिक अग्रवाल असोसिएट्स अँड एल.एल.पी.चे संचालक सी.ए. कार्तिक अग्रवाल यांनासुद्धा सी.ए. दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी नवीन पनवेल शाखेच्या शाखा प्रबंधक नम्रता कामडी म्हणाल्या की, मानवाचे खऱ्या अर्थाने बहुमूल्य संरक्षण जर कोणी करत असेल तर ते आपण डॉक्टर्स आहात. दिवसेनदिवस आपल्या कामाचा ताण वाढतो आहे पण आपण मानव कल्याणासाठी मोठे मोलाचे कार्य करीतआहात. तसेच आर्थिक जगतात सी. ए. चे पण खूप महत्वपूर्ण योगदान आहे. सध्याच्या युगात प्रत्येक नागरिकाने आर्थिक साक्षर होणे फारच महत्वाचे आहे.त्यासाठी सी.ए. खूपच महत्वातची भूमिका निभावत आहेत.त्याच्या सेवे बद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करणे फार गरजेचे आहे. याप्रसंगी अरविंद मोरे म्हणाले की, आपण आमचे सन्माननीय ग्राहक आहात. आमचे सुद्धा सेवा देणे हेच प्रथम कर्तव्य आहे. आपण देत असलेल्या मानव सेवे बदल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. बँक आपल्या प्रति समाजाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करते व भविष्यात सुद्धा आपण असेच मानव कल्याणाचे कार्य कराल असा विश्वास व्यक्त करतो. याप्रसंगी डॉ.शुभदानील व सी.ए. कार्तिक अग्रवाल यांनी बँकेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल बँकेचे आभार मानले व या उपक्रमामुळे नक्कीच त्यांना प्रोत्साहन मिळून आत्मविश्वास वाढेल असा विश्वास व्यक्त केला.
0 Comments