दत्तात्रय शेडगे खोपोली : ३ जुलै,
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांचा कोकण दौरा चालू झाला असून येत्या बुधवारी रोजी ते वावोशी येथील पक्ष कार्यालयात येऊन कार्यकत्याशी संवाद साधणार आहेत, आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा यांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी पक्ष संघटना बांधणीसाठी जोरदार प्रयन्त केले असून यात रासपनेही कंबर कसली आहे, कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटना वाढीसाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हा दौरा आहे माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांचा कोकण दौरा चालू झाला असून येत्या दोन दिवस ते रत्नागिरी आणि चिपळूण येथील कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत तर बुधवारी ५ जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील वावोशी येथे दुपारी १ वाजता येणार आहेत, वावोशी येथील पक्ष कार्यालयात ते उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत तर निधी संकलनाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे, त्यामुळे कोकणातून सर्व रासपच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रासपचे कोकण विभाग अध्यक्ष भगवानभाई ढेबे यांनी केले आहे
0 Comments