आसरे - जांभिवली वाकी नदिच्या ठिकाणी असलेल्या संरक्षण भिंती मुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान,शेतात माती, पिक गेले वाहून,
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
आसरे /जांभिवली १९ जुलै,
गेले अनेक दिवस पाउस पडत असल्यामुळे तालुक्यात पुर स्थिती निर्माण झाले आहे.पाउस सातत्याने पडत असल्यामुळे भात लागवडीची कामे खोलंबळी आहे.मात्र या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्यांचे निदर्शनास येत आहे आसरे - जांभिवली येथिल वाकी नदिच्या किणारी बांधलेल्या संरक्षण भिंतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यांचे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडत आहे.
या संरक्षण भिंतीमुळे पावसाळ्यात मोठे नुकसान होत असल्यांची ही बाब प्रशासन यांस निदर्शनास दिली होती. शिवाय ही भिंत पाडण्यासाठी उपोषण चे हात्यार ही उपसण्यात आले. विधान सभेत हा मुद्दा चर्चेचा विषय बनला होता.मात्र कोठे माशी शिंकली असा प्रश्न सध्या शेतकरी वर्गांस निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे यांच्या माध्यमातून अनेक आंदोलन करण्यात आली.या भिंतीमुळे मोठे नुकसान होणार असे सुचविण्यात आले होते.मात्र या कडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी वर्गांस उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.
शेतामध्ये माती बरोबर शेतातील राब भात लागवड या पाण्यांच्या प्रवाहा मुळे वाहून गेल्यामुळे शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान झाले आहे.हा परिसर जलमय परस्थिती निर्माण झाल्यामुळे जिकडे - तिकडे पाणी पहावयास मिळत आहे.या ठिकाणी शेती होती की नाही अशी स्थिती पाण्यामुळे निर्माण झाली आहे. येथिल कुटुंबाचे उदार निर्वाहांचे साधन भात शेती असून तीच आता धोक्यात आल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे.
चौकट :
या परिसरात ही संरक्षण भिंत बांधल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण परिसरात तळावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.शिवाय अनेक शेतकरी बांधवांच्या जमीणी पाण्याखाली गेली असून शेतात माती आणी पिके नष्ट झाल्यांचे निदर्शनास येत आहे.मात्र अनेक वेळा शासकीय उंबरठे झिजवून पदरी शेतकरी बांधवांच्या अश्रूंचा पुर शिवाय काहीच मिळाले नाही ( सामाजिक कार्यकर्ते आसरे - जांभिवली सुरेश गावडे )
0 Comments