पहिल्याच पावसात निकृष्ट क्ले पेवर ब्लॉक ची दुर्दशा शासनाचे करोड रुपये चा चुराडा

 


मुकुंद रांजाणे 
माथेरान : ८ जुलै,
      
                  माथेरान मध्ये मागील काही वर्षांमध्ये धूळ विरहित रस्त्यांना पर्याय म्हणून क्ले पेवर ब्लॉक वापरून येथील अनेक रस्ते बनविण्यात आले माथेरानला प्रवेश करणारा महात्मा गांधी हा मुख्य रस्ता सुद्धा यामध्ये सहभागी होतात परंतु पहिल्याच पावसात ठेकेदाराची पोलखोल होत असून या मार्गावरील अनेक ब्लॉक वितळले जात असून त्या ठिकाणी खड्डे पसरू लागल्याने या ब्लॉकच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असून एम एम आर डी ए च्या माध्यमातून हे रस्ते बनवले जात असताना या ठेकेदारावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
              माथेरान मधील रस्ते धूळ विरहित व्हावे याकरिता माथेरान व्यापारी संघटना व स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर माथेरान सनियंत्रण समितीने २०१३  साली रंगनाथन यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम येथील श्री पीसरनाथ मार्केट व कोतवाल रोड मार्केट या रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ब्लॉक बसविण्यास परवानगी दिली व हे रस्ते आजही टिकून आहे त्यावेळी वापरलेल्या ब्लॉकचा दर्जा अतिउच्च असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असूनही व पिसरनाथ मार्केटचा रस्ता चढावाचा असूनही हे रस्ते आजही उत्तम प्रकारे टिकून आहे व या रस्त्यांवरून घोडे घसरण्याचे प्रमाण ना बरोबर आहे ,                                                     हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सनियंत्रण समितीने माथेरान मधील इतर रस्त्यांना टप्प्याटप्प्याने हे ब्लॉक बसविण्यास मंजुरी दिली होती त्याप्रमाणे येथील अनेक रस्ते बनविण्यात आले परंतु काही ठिकाणी वापरण्यात आलेल्या ब्लॉकचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने या रस्त्यांवरील ब्लॉक पूर्णपणे वितळण्यास सुरुवात झाली होती या ब्लॉकच्या ठिकाणी खड्डे दिसून येत होते माथेरान मुख्य बाजारपेठेतील रस्ता याच ब्लॉकने बनविण्यात आला व पहिल्याच पावसात या रस्त्यांवर ब्लॉक ऐवजी खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत, 
                  माथेरान रेल्वे स्टेशन परिसरातील ब्लॉक च्या जागी मोठमोठे खड्डे पडू लागले असून त्यामध्ये अनेक पर्यटक, मुलांचे पाय मुरगळत आहेत त्याचप्रमाणे येथून चालणाऱ्या घोडे व हातगाडी चालकांन त्याचा त्रास सोसावा लागत आहे परंतु माथेरानमध्ये सध्या लोकप्रतिनिधी व कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने या रस्त्यांकडे सध्या तरी दुर्लक्ष तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे एम एम आर डी ए चे अधिकारीही माथेरानला अनेक दिवसांपासून फिरकले नसल्याने या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सिद्ध होत आहे 
                या रस्त्याच्या डागडुगी करिता ठेकेदार जबाबदार असल्याचे केलेल्या करारामध्ये नमूद असल्यामुळे हे खड्डेमय ब्लॉक तातडीने बदलण्यात यावे अशी मागणी माथेरान मधून होत आहे व निकृष्ट दर्जाचे ब्लॉक बसवणाऱ्या ठेकेदारास याचा जाब विचारावं असे काही नागरिक बोलून दाखवीत आहेत.

Post a Comment

0 Comments

मराठा,कोळी,आगरी,अदिवासी यांची भर सभेत इज्जत काढत असलेला आमदार यांची जागा दाखवून द्या : प्रितम जे. एम.म्हात्रे