भाजप महिला आघाडीने बांधल्या रिक्षा चालकांना राख्या

 भाजप महिला आघाडीने बांधल्या रिक्षा चालकांना राख्या



जयवंत माडपे ( पाताळगंगा न्यूज )
खोपोली : २९ ऑगस्ट

              भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज खोपोली शहरातील विविध रिक्षा स्टॅन्ड वर जाऊन रिक्षा चालकांना राख्या बांधल्या, या अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमाने रिक्षा चालक काही काळ भाऊक झाले.
                भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शहर महिला मोर्चा अध्यक्ष शोभा काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, शहर उपाध्यक्ष अपर्णा साठे ,ज्येष्ठ कार्यकर्त्या स्नेहल सावंत, गीता मोहिते, तसेच डॉक्टर अस्मी सावरेकर, सीमा मोगरे ,विमल गुप्ते, इत्यादी अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. रक्षाबंधन कार्यक्रमाचा समारोप शहर मध्यवर्ती कार्यालयात पार पडला.
               या कार्यक्रमाला शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, सरचिटणीस हेमंत नांदे, शहर उपाध्यक्ष श्री. पाटील ,राकेश दाबके, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजय इंगुलकर, सरचिटणीस विनायक माडपे. सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर