एक दिवस दप्तरा शिवाय शाळा,पर्यावरणाचा आभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची जंगल भ्रमंती

 एक दिवस दप्तरा शिवाय शाळा,पर्यावरणाचा आभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची जंगल भ्रमंती




पाताळगंगा  न्यूज : वृत्तसेवा
वडगांव  : ६  जुलै,

        विद्यार्थ्यांच्या पाठपुस्तकात,पर्यावरण हा विषय आवर्जून असतो.यामुळे शिक्षक सातत्याने ह्या विषयी त्यांना शिक्षण देत असतात.त्यांना प्रत्यक्षात निसर्गाच्या सानिध्यात जडलेली सौंदर्य सृष्टी जवळून पाहिल्यांस आभ्यास करणे सोपे जात असते. त्याचबरोबर पावसाळ्यात डोंगरांच्या कुशीतून वाहणारे सुंदर धबधबे,यामुळे आपणांस एक प्रकारचा आनंद मिळत असतो.निसर्गाच्या सानिध्यात दडलेल्या नैसर्गिक सौंदर्य जवळून पाहाता यावे यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथिल शिक्षक वर्गांनी एक दिवस दप्तरा शिवाय शाळा,आणी पर्यावरणाचा आभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची जंगल भ्रमंती उपक्रम हाती घेण्यात आला.

                   विद्यार्थी सातत्याने शाळेत येत असतात.मात्र एक दिवस दप्तर न घेता निसर्गातील पर्यावरणाचा आभ्यास करण्यात यावे,आपल्या आजूबाजूच्या परिसरात विविध वनस्पती असतात.त्यांची वाढ कशी होते,त्याच बरोबर याविकास,पोषण,पर्जन्यमान व पाण्याचे स्त्रोत्र, वृक्षांची माहिती त्यांचे औषधी वनस्पती आहे का? किंवा विषारी वनस्पती आहे का ? या सर्व बाबीचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.  त्याच बरोबर पाण्यांचे असलेले विविध स्त्रोत्र विहीर,ओढा,नदी,झरे,पाणवठे,धबधबे,तलाव)याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
             

  यामुळे विद्यार्थ्यांना जंगल भ्रमंती करून पर्यावरण विषयक प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.प्रत्यक्ष निसर्ग आणि पुस्तकातील घटकांची सांगड घातल्यामुळे मुलांच्या शिकण्यात आनंद मिळत असतो,निसर्गाविषयी प्रेम अबाधित रहाता यावे,वृक्ष संवर्धनाचा अमोल ठेवा जतन करण्यात यावे, कारण यापासून आपणांस खूप काही मिळत असते.असे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांस करण्यात आले.यावेळी यावेळी पालक गणेश दळवी,शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा राजश्री जांभुळकर,मुख्याध्यापक सुभाष राठोड,विषय शिक्षिका  कवाद मॅडम,सह शिक्षक वैजनाथ जाधव, साक्षी जांभुळकर,तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.


चौकट       
  
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून जे ज्ञान प्राप्त होते ते चिरकाल स्मरणात राहते,डोळ्याने पाहणे,निरीक्षण करणे, आकलन करणे यामुळे मेंदू,मन आणि मनगट एकावेळी कार्य करतात त्यामुळे मुलांना लवकर समजते.
सुभाष राठोड, मुख्याध्यापक रा.जि.प.शाळा, वडगाव 

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन