श्री साई नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शालेय साहित्यांचे वाटप

 श्री साई नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शालेय साहित्यांचे वाटप


संजय कदम 
पनवेल : ६ ऑगस्ट,

       सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने यांच्या ४८ व्या वर्षी पनवेल परिसरातील ६०० शालेय विद्यार्थ्यांना पनवेल रेल्वे स्टेशन जवळील साईबाबा मंदिरात आज शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
                 श्री साई नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, श्री साई नारायण बाबा आश्रम, श्री साई बाबा मंदिर पनवेल यांच्यावतीने यांच्या ४८ व्या वर्षी सद्गुरू साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने पनवेल परिसरातील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांसह शाळेचा गणवेश व दप्तरचे वाटप पनवेल महानगर पालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले.
         यावेळी मा नगरसेवक अजय बहिरा, शास्त्रीजी विश्व्नाथ भट, रामलाल चौधरी, राम थदानी, साईसेवक रमेश भोळे, पत्रकार संजय कदम, डॉ. शकुंतला आदी मान्यवरांसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते. यावेळी प्रथमच श्री सैनारायन बाबा यांनी लिहिलेल्या ज्ञानसागर पुस्तकाचे मोफत वाटप उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना करण्यात आले.           

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन