चंद्रयान ३ च्या यशाबद्दल श्री. विरूपाक्ष महादेव मंदिर ट्रस्ट व आरएसएसच्या स्वयंसेवकांनी महाआरती करून केला जल्लोष

 चंद्रयान ३ च्या  यशाबद्दल श्री. विरूपाक्ष महादेव मंदिर ट्रस्ट व आरएसएसच्या स्वयंसेवकांनी महाआरती करून केला जल्लोष



संजय कदम 
पनवेल : २४ ऑगस्ट,

             चंद्रयान-३ च्या ' विक्रम 'चे चंद्रावर यशस्वी अवतरण होताच संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण संचारले आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली. चांद्रयान-३ विक्रमचे यशस्वी अवतरण झाल्याची आनंदाची वार्ता कानी पडताच पनवेल येथील श्री.विरूपाक्ष महादेव मंदीरात श्री. विरूपाक्ष महादेव मंदिर ट्रस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी श्री. महादेवासमोर आरती करून भक्ती भावनेने उत्साह आणि जल्लोष साजरा केला. त्यानंतर चंद्रयान ३ च्या यशासाठी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
      इस्रोच्या चांद्रयान -३ मोहिमेचा चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरणाचा दुर्मिळ क्षण अनेक नागरिक समाज माध्यमासह दूरचित्रवाणीवर पाहत होते. चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच पनवेलमधील श्री. विरूपाक्ष महादेव मंदिर ट्रस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला आनंद साजरा केला.  श्री.विरूपाक्ष महादेव मंदीरात श्री. महादेवासमोर आरती करून भक्ती भावनेने चंद्रयानच्या यशाचा जल्लोष साजरा केला. त्यानंतर विरूपाक्ष महादेव मंदीरासमोर फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. 

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन