चंद्रयान मोहीम यशस्वी, आप तर्फे आनंदोत्सव साजरा,देशासाठी ऐतिहासिक दिवस

 चंद्रयान मोहीम यशस्वी, आप तर्फे आनंदोत्सव साजरा,देशासाठी ऐतिहासिक दिवस 





पाताळगंगा : न्यूज वृत्तसेवा 
खोपोली : २३ ऑगस्ट,

      भारताची महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान -३’ मोहीम यशस्वी झाली आहे.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. याशिवाय चंद्राच्या पृष्ठभागावर यान अलगद व सुरक्षितपणे उतरविण्याच्या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणारा भारत हा अमेरिका, रशिया (तत्कालीन सोव्हिएत रशिया), चीननंतर चौथा देश ठरला आहे.
           

सदर ऐतिहासिक घटनेचा आम आदमी पार्टी तर्फे राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला असून नागरिकांमध्ये मिठाई वाटप करण्यात आली. चंद्रयान मोहीम फत्ते करणे ही आपल्या देशासाठी खूप गर्वाची बाब असून असे प्रसंग क्वचितच जीवनात येतात म्हणून अशा प्रसंगांना आपण देशाचा एक मोठ्या सणाप्रमाणे साजरा करायला हवे असे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ शेखर जांभळे यांनी सांगितले.


                आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी देशाला अभिमान वाटेल असे कार्य केले आहे त्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे सर्व शास्त्रज्ञांचे आम्ही आम आदमी पार्टी तर्फे अभिनंदन व्यक्त करतो.सदर कार्यक्रमाच्या वेळी नागरिकांमध्ये जबरदस्त उत्साह आणि आनंद होता व सर्व सदस्यांनी त्यांना पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन