बोरघरहवेली हायस्कूलमध्ये जागतिक पौष्टिक तृणधान्य,निमित्ताने प्रभातफेरी काढून नागरिकां मध्ये जनजागृती
कृष्णा भोसले
तळा : १५ ऑगस्ट,
बोरघर हवेली येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर येथे जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत आज विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फळक घेवून तृणधान्याचा आहारात समावेश जास्तीत जास्त घेणे ही काळाची गरज आहे. मानवी आहारात दैनंदिन जीवनात यावेळी पौष्टिक तृणधान्याबद्दल विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून दिले.
जिवनात आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी पौष्टिक तृणधान्य असणे गरजेचे आहे.याबाबत कृषी विभागाचे पर्यवेक्षक जितेंद्र गोसावी, कृषी सहाय्यक योगेश कोळी, सुमित पुरी यांनी माहिती दिली.पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश असावा अशी विस्तृत माहिती दिली.
यावेळी मुख्याध्यापिका किरण चव्हाण, उप शिक्षक प्रशांत शिंदे, व इतर शिक्षक, कर्मचारी, विदयार्थी विदयार्थीनी उपस्थित होते.
0 Comments