ग्रूप ग्राम पंचायत वडगांव च्या माध्यमातून वाशिवली,बोरीवली,कैरे येथे सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या हस्ते विकास कामचे भूमिपूजन
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : १५ ऑगस्ट,
ग्रूप ग्राम पंचायत वडगांव यांच्या माध्यमातून सरपंच पदावर गौरी गडगे विराजमान झाल्यापासून विविध विकास कामचा धुमधडाका सुरुच आहे,विरोधकांस न जुमानता गावतील समस्या जाणून घेवून त्या तातडीने सोडविण्यात ते अग्रेसर आहेत.आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनांचे औचित्य साधून वाशिवली येथे नवीन नलपानी पुरवठा योजनेचा शुभारंभ,कैरे,बोरिवली येथे व्यायामशाळा साहित्याचे अनावरण,या कामचे अनावरण करण्यात आले.
वाशिवली येथिल पिण्याच्या पाण्यांची नविन पाईप लाईन टकण्यात येणार आहे.पाण्याचा प्रवाह सुरळीत पणे सुरु राहून महिला वर्गांस मुबलक पाणी मिळावे यासाठी ग्रूप ग्राप पंचायत वडगांव सरपंच यांनी पुढाकार घेवून त्यांची समस्या विचारात घेवून हा कार्यक्रम हाती घेण्यात आली.यावेळी महिला वर्गामध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाल्यांचे पहावयास मिळाले,पाणी हा जिवनातील अविभाज्य घतक असून आपण पदावर असतांना विकास कामात खंड पडू देणार नाही असे प्रतिपादन सरपंच गौरी गडगे यांनी केले.
त्याच बरोबर गावतील तरुण वर्गाचे शरीर पिळदार व्हावे यासाठी यासाठी कैरे,बोरीवली या गावतील व्यायम साहित्यांचे पुजन करण्यात आले.
तरुण वर्गांना व्यायाम करण्यासाठी मोहपाडा आश्या व्यायाम शाळेत जावे लागत होते.मात्र काही तरुण मुलांकडे वेळेची मर्यादा कमी असल्यामुळे शारीरिक व्यायाम करावयास मिळत नाही ही खंत जाणून घेवून आज या दोन्ही गावातील व्यायाम शाळेच्या साहित्यांचे पूजन करण्यात आले.
यावेळी रश्मी शिंदे ग्रामविकास अधीकारी, सदस्य- वर्षा संतोष पाटील ,सदस्य शिवाजी तु शिंदे सदस्य , राजेश ह पाटील सदस्य, महादेव क गडगे, सदस्य संदेश ज माळकर सदस्य दशरथ देहू पाटील, संतोष ल पाटील, संदीप बा शिंदे, ह्रिदान स पाटील, मदन ठोंबरे,सदस्या - नीता संदीप पाटील,योगिता सं भोईर सदस्य राजेश हरिश्चन्द्र पाटील, शिवाजी तु शिंदे संदीप पाटील,संतोष पाटील, संदीप शिंदे, अजित भोईर,हरेश भागा पाटील सदस्य,नंदकुमार दत्तात्रेय पाटील सदस्य, जयश्री बाळकृष्ण पाटील तसेच ग्रामस्थ नवतरुण मंडळ उपस्थित होते.
0 Comments