कळंबोली सह पनवेल महानगर पालिका हद्दीतील गावांमधील तोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पुनर्बांधणी करण्याची शेकापचे मा. नगरसेवक रवींद्र भगत यांची पुर्नमागणी
संजय कदम
पनवेल : २२ ऑगस्ट,
कळंबोली सह पनवेल महानगर पालिका हद्दीतील गावांमधील तोडण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पुनर्बांधणी करण्याची मागणी शेकाप मा नगरसेवक रवींद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात मा नगरसेवक रवींद्र भगत यांनी म्हंटले आहे की, कळंबोली सह पनवेल महानगरपालिका हद्दितील खिडूकपाडा, घोट, घरणागाव, तळोजा पाचनंद, काळुंद्रे, अडवली, पिसार्वे गाव व इतर गावातील धोकादायक पाण्याच्या टाक्या तोडण्यात आलेल्या पुर्नबांधकाम करण्याकरीता सातात्याने महासभेत व महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला असता सदर कामे २०२१ अखेरीस सुरु करण्यात येतील असे पत्राद्वारे लिखिति देवून सुध्दा काम करण्यात आले नाही.
तसेच गेल्या ५ वर्षभरापासून सातत्याने पाण्याच्या टाक्या संदर्भात महानगरपालिकेकडे अर्ज उपोषण, अंदोलण ही केले परंतु आजतागायत कळंबोली सह पनवेल महानगपालिकेतिल तोडण्यात आलेल्या टाक्यांचे व इतर पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाचे निविदा टेंडर काढून सुध्दा अद्याप कामाला सुरुवात झालेले नाही.
आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेलय शब्दाच्या अनुशंगाने सर्व बाधित ग्रामस्थ अपेक्षित की येणा-या सात दिवसात तरी योग्य तो निर्णय घेवून पाण्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून कळंबोली सह महानगरपालिकेतील तोडण्यात आलेल्या टाक्या व इतर पाण्याच्या टाक्यांचे पुर्णबांधकाम अतितात्काळ मुहूर्त मेढ (शुभारंभ) करुन कामाला सुरुवात करण्यात यावी अशी मागणी भगत यांनी केली आहे.
0 Comments