१८५७ च्या स्वातंत्र्य समराचे सेनानी नानासाहेब पेशवे द्विशताब्दी जन्मोत्सव समिती ची सभा संपन्न
दीपक जगताप
खालापूर : २२ ऑगस्ट,
१८१८ ला मराठ्यांचे राज्य अस्तास गेले आणि अवघा भारत पारतंत्र्यात पडला.त्या विरोधात १८५७ साली संपूर्ण देशात स्वातंत्र्य युद्ध पेटले.काश्मिर सिंध पासून केरळ पर्यंत प्रांताप्रांतात प्रखर संघर्ष झाला. राजे , सरदार, संस्थानिक , सैनिक,शेतकरी, व्यापारी, महिला, संन्यासी , वनवासी हे सारे लढले.इंग्रज सरकार पासून पूर्ण गुप्तता पाळत सर्व देशात एकाच वेळी उठाव झाला.या समराचे नेतृत्व करणारे नानासाहेब पेशवे यांचे येणारे वर्ष हे द्विशताब्दी जन्म वर्ष आहे.
संपूर्ण देशाचे नेतृत्व करणाऱ्या नानासाहेब पेशवे यांचा जन्म कर्जत जवळच्या वेणगाव येथे ८ डिसेंबर १८२४ रोजी झाला ही आपल्या साठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.या वर्षी ८ डिसेंबरला त्यांच्या दोनशेव्या जयंती वर्षास प्रारंभ होत आहे.
या वर्षभरात करावयाच्या कार्यक्रमावर विचारविनिमय करण्यासाठी कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक अभिनव ज्ञान मंदिर शिक्षण संस्था कर्जत या ठिकाणी आयोजित केली होती..या वेळी व्यासपीठावर इतिहासाचे अभ्यासक मोहन शेटे सर, रायगड स्मारक समितीचे कार्यवाह सुधीर थोरात, शिवशंभो विचार दर्शन संस्थेचे कोकण प्रांत संयोजक अभय जगताप, रुपेश मोरे, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश वैद्य, महालक्ष्मी देवस्थान वेणगाव संस्थेचे अध्यक्ष रंजन दातार उपस्थित होते. मोहन शेटे यांनी नानासाहेब पेशवे यांचे कार्य त्यांच्या ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांचा अप्रगत इतिहास सर्वांसमोर मांडला.
राष्ट्रभक्ती जागरण करणारे हे आगामी वर्ष मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचे ठरले.
यात नानासाहेब यांचे स्मारक, पुतळा, अभ्यासिका, निबंध स्पर्धा, जाहीर कार्यक्रम, प्रदर्शनी असे ठरवण्यात आले.यावेळी दीपक बेहेरे, रमेश मुंडे, नितीन कांदळगावकर, राजेश भगत, सागर सुर्वे, संतोष देशमुख, पंकज शहा, बळवंत घुमरे, विजय मांडे, विलास वैद्य, विवेक जोशी, संजय वझरेकर, संदीप भोसले, सदानंद जोशी, सुचिता जोगळेकर, रामदास गायकवाड, सुधाकर निमकर,
महेश निघोजकर, साईनाथ श्रीखंडे, अविनाश मोरे, ओमकार शिंदे, अतिश सुर्वे, सूर्यकांत गुप्ता, संतोष तांडेल,प्रशांत शिंदे, मिलिंद खंडागळे, प्रमोद काटे, सचिन करडे, शंतनू भोर, ईश्वर शेळके, ओमकार गोसावी, मनीषा डुमणे, रवींद्र देशमुख, अनिकेत भोसले समीर आव्हाड आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
0 Comments