आत्मा योजने मार्फत शेतकऱ्यांना मत्स्य बीजाचे वाटप,कृषी विभागाकडून शेतीपूरक व्यवसायास प्रोत्साहन

 आत्मा योजने मार्फत शेतकऱ्यांना मत्स्य बीजाचे वाटप,कृषी विभागाकडून शेतीपूरक व्यवसायास प्रोत्साहन



 कृष्णा भोसले
तळा : २३ ऑगस्ट,
 
              तळा तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे परंतु सदर शेततळ्यांचा वापर शेतीच्या पाण्याची गरज भागवणे इतपर्यंतच सिमित होता यामध्ये  बदल करण्यासाठी व शासनाचा  शेती व शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे व आर्थिक स्तर उंचावणे हा मुख्य हेतू नजरेसमोर ठेवून कृषी विभाग व आत्मा मार्फत तसेच मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांच्या विशेष प्रयत्नातून १४ शेतकरी बांधवांना ७००० रोहू व ७००० कटला या जातीचे बोटुकली मत्स्य बीज  वाटप तालुका कृषी अधिकारी आनंद कंबळे यांच्या हस्ते करण्यात आले . 

                 या नंतर मत्स्य बीजाचे संगोपन व संवर्धन कसे करावे त्यांना खाद्य कोणते व कसे द्यावे या विषयी विस्तृत माहिती आनंद कांबळे यांनी दिली.या मत्स्य बीज वाटपाचे लाभार्थी म्हणून
सुरेश महादेव कदम- साळशेत, रविंद्र गणपत मांडवकर - वाशी महागाव, सुमित्रा कृष्णा कडू- बारपे,नारायण देऊ चाळके - बेलघर,सुभाष अमृता आंबरले - बेलघर,चंद्रकांत बंधू सावंत - बेलघर , रघुनाथ तुकाराम शिंदे - रोवळा , रमेश बाळाजी ताम्हणकर - वाशी हवेली, सुरेश सखाराम कजबले - कुंबेट अब्दुल रहाटविलकर-वावे मंद्रज, लक्ष्मण हरी ठमके,मालाठे 
   
             हरिश्चंद्र देवजी लोखंडे  मालाठे,जनार्दन विठोबा अंबारले-बेलघर,मुकुल धनप्रकाश बन्सल यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव, कृषी अधिकारी श्री सुनील गोसावी,आत्मा बीटीम सचिन लोखंडे व कृषी सहायक, कार्यालय कर्मचाऱ्यी तसेच शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन