रा.जि.प उर्दू शाळा, हाळखुर्द शंभर वर्षापेक्षा अधिक काळानंतर ही पूर्णबांधनीच्या प्रतीक्षेत,दुरुस्ती न करता पुनर्बांधणीचीच आवश्यकता,उपसरपंच अझीम मांडलेकर
दत्तात्रेय शेडगे
खालापूर : २३ ऑगस्ट,
अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करताना देशात शैक्षणिक बाबतीत आज ही निर्णय घेण्यासाठी प्रशासन विलंब करत असल्याचे उदाहरण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात हाळ खुर्द ग्रामपंचायतिच्या हद्दीतील अंदाजे १२ गुंठ्यांत असलेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या पडीक अवस्थेतील शाळेला पाहून समजते
१९०५ साली रेती ,खडी मातीचे कवळे, लाकडी वासे वापरून बांधण्यात आलेली ही शाळा आजच्या वेळी जमिनीच्या जोत्या पासून कमकुवत कमजोर झाली आहे. छप्पर,भिंती,खिडकी अतिशय खराब झाल्याने कधीही हा भयानक अशी जीव घेणी स्थिती निर्माण होऊ शकते.
तालुक्यातील अल्पसंख्यांक वसाहतीतील सुमारे ४००० लोकसंख्या पेक्षा जास्त दाटलोक वस्ती असलेल्या ह्या गावात ११८ वर्ष जुन्या असलेल्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्या १२८ जणांच्या परिवारातील लहान लेकरांना जीव मुठीत धरून कधी पर्यंत पाठवायचं अशी चिंता पालकांना सतावत असते.
सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच अझीम मांडलेकर यांच्या शिष्टमंडळाच्या पाठवपुराव्या मुळे २०२० पासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासना कडे शाळेच्या पुनर्बांधणी साठी सातत्याने मागणी चालू असताना इतर विकास कामांना निधी देऊन अल्पसंख्याक समाजाच्या उर्दू शाळे साठीचा निधी आज पर्यंत मिळत नसल्याने अनेक मुस्लिम बांधव नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. शाळेची अवस्था पाहत जनसहभाग व दानशूर उद्योजक नौफिल सय्यद यांच्या साह्याने आर्थिक मदत घेत शाळेची तात्पुरती दुरुस्ती, रंग रंगोटी करण्यात आली होती.
अनेक वर्षे दुर्लक्षित करणाऱ्या खालापूर गटशिक्षणाधिकारी विभागाकडे याबाबत माहिती घेतली असता दुरुस्तीसाठी म्हणून साधारणता १५ लाख रुपये निधी देणार येणार असल्याचे समजले. ज्या उर्दू शाळेचा सिव्हिल स्ट्रक्चर पायाच मजबूत राहिला नाही त्या शाळेत जमिनीतून पाणी वर येत असेल अश्या परिस्थिती औपचारिक दुरुस्ती करून भविष्यात होणाऱ्या जीवितहानीला आमंत्रण द्यायचे का ? अभियंता व प्रशासकीय अधिकारी यांना विद्यार्थी म्हणून असलेल्या लहान मुले व शिक्षकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा अधिकार कोणी दिला असा संतापजनक सवाल ग्रामस्थ उपस्थित करताना दिसले.
शाळेत कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा नसल्याने उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याने उर्दू भाषेबद्दल असलेले महत्त्व साहित्यिक योगदान याबाबत असवेंदनशीलता दाखवणारे अधिकारी,लोकप्रतिनिधी,
शालेय समिती सदस्य आजही ह्या बाबतीत गंभीरपणे विचार करत नसून शिक्षणाचा शैक्षणिक दर्जा उंचावा व सोयी सुविधा उपलब्ध असलेली शाळा अस्तित्वात व्हावी असा कुठल्याही प्रकारचा नियोजन करत नसल्याने ग्रामस्थांनी याबाबत लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलने करण्याची मानसिकता दर्शविली आहे.
ह्यावेळी सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच अजीम मांडलेकर ,सरपंच शबनम मुल्ला, सदस्य कासिम बेडेकर ,सदस्य कमली वाघमारे ,सदस्य असिफ बेडेकर, सदस्य प्रभास क्षीरसागर ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जाहिदा मुल्ला, ग्रामस्थ मंगेश क्षीरसागर ,चंदर वाघमारे तसेच शालेय मुख्याध्यापक जलालुद्दीन सांगरे ,शिक्षक कय्युम दाखवे ,अहमद वाडेकर, शगुप्ता सय्यद, ग्रामसेवक स्वप्नाली बागल,पत्रकार आदी अल्पसंख्याक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
चौकट
स्थानिक आमदार व जिल्हा प्रशासन यांच्या प्रयत्नाने लवकर तातडीने याबाबत निर्णय व्हावा अशी अपेक्षा ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्वे करत आहोत...
अझीम मांडलेकर,उपसरपंच- हाल ग्रामपंचायत
चौकट
पुनर्बांधणी न करता तात्पुरती दुरुस्ती केल्यास भविष्यातील होणाऱ्या जीवितहानीला प्रशासन जबाबदार राहील, शबनम मुल्ला ग्रामस्थ
चौकट
अल्पसंख्यांक समाजाचा शैक्षणिक धोरणाबाबत दुर्लक्षित करणाऱ्या घटकांना समाज बांधव म्हणून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही...
मंगेश क्षीरसागर,ग्रामस्थ
चौकट
शालेय नवीन इमारत, सुरक्षा भिंत, ,पाण्याची टाकी, आधुनिक प्रयोगशाळा,शौचालय ,संगणक कक्ष,कर्मचारी भरती,पहिली ते दहावीपर्यंत आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वर्ग खोल्या नवीन पुनर्बांधणीसाठी आवश्यक नियोजन आहे,शाबीर शेख ,भाजपा प्रदेश अल्पसंख्याक नेते
0 Comments