लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक येथे स्वच्छता गृह, सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते भुमिपुजन

 लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक, येथे स्वच्छता गृह, सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते भुमिपुजन 





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
चौक : २४ ऑगस्ट,

                लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक या ग्रंथालयाला १०३ वर्ष होवून गेले.या ठिकाणी
 वर्तमान पत्रे समवेत विविध पुस्तके उपलब्ध असल्यामुळे या परिसरातील शेकडो नागरिक वाचण्यासाठी येत असतात.मात्र या मध्ये जेष्ठ नागरिक यांचा समावेश मोठ्याप्रमावर असल्यामुळे त्यांना स्वच्छता गृह नसल्यामुळे मोठी गैरसोय होत असल्यांचे ग्रूप ग्राम पंचायत चौक चे सदस्य अजिंक्य अशोक चौधरी यांनी सरपंच रितू ठोंबरे यांच्या निदर्शनास आणून देताचं,आज त्यांच्या हस्ते या स्वच्छाता गृहाचे भूमिपूजन करण्यात आले.
           


              लोकमान्य टिळक मोफत वाचनालय शेकडो वर्ष होवूनही आज मोठ्या दिमाखात सुरु आहे.विशेष म्हणजे येथिल कार्यकारणी सदस्य या ग्रंथालय सातत्याने देखरेख करीत असल्यामुळे वाचकांस कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्या तातडीने सोडविण्यांस ते अग्रेसर असतात.विशेष म्हणजे या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम, नियोजन असते. यामध्ये आरोग्य शिबिर, मेळावे,व्याख्याने,पुस्तक प्रदर्शन,महिला वर्गांसाठी विविध उपक्रम, या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांची, वाचक वर्गाची व मुख्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची अत्यंत गैरसौय होत असल्यामुळे  या ठिकाणी स्वच्छता गृह बांधण्यात येत असल्यांचे वाचनालयाचे अध्यक्ष  सुरेश वत्सराज यांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.
         


             यावेळी ग्रंथपाल अभिजित चौधरी,सतिष आंबवणे,राजेश आंबवणे,डॉ.अपर्णा वाळिंबे,सदस्य पूजा हातमोडे, वृषाली पोळेकर,सर्व कमिटी सदस्य तसेच चौक ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,ग्रामस्थ चौक आणी वाचक वर्ग उपस्थित होते.


                

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन