ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती चा मार्ग झाला मोकळा!

 ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती चा मार्ग झाला मोकळा! 


महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांचा पुढाकार, खासदार आप्पा बारणे यांचा पाठपुरावा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश!


संजय कदम 
पनवेल : २४ ऑगस्ट,


              ओबीसी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क किंवा शिष्यवृत्ती चा लाभ मिळू शकणाऱ्या 64 अभ्यासक्रमांची यादी शासन निर्णयाने जाहीर करण्यात आली परंतु त्या शासन निर्णयामध्ये "इलेक्ट्रॉनिक अँड कम्प्युटर इंजीनियरिंग" हेच नाव दोनदा आले. "इलेक्ट्रॉनिक अँड कम्प्युटर सायन्स" ह्या विषयाकरता देखील मिळणारी शिष्यवृत्ती शासकीय अध्यादेशात नाव चुकीचे किंवा छापलेच नसल्याने विद्यार्थ्यांना मिळाली नव्हती. पनवेल मधील पिल्लेज महाविद्यालयात ही शिष्यवृत्ती मिळणार ह्या आशेने दोन वर्षांपूर्वी प्रवेश घेतलेल्या तब्बल 60 विद्यार्थी या शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले 
              महाविद्यालयाने शासनाशी पत्रव्यवहार करूनही काही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेरीस कॉलेजने विद्यार्थ्यांकडे लाखो रुपये फी ची मागणी करण्यास सुरुवात केली. विद्यार्थी व पालकांनी महानगरप्रमुख मा. नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांना हा विषय सांगताच सोमण यांनी पुढाकार घेऊन मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना या विषयाबद्दल माहिती दिली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार बारणे यांनी त्वरित विषयाचा पाठपुरावा सुरू केला व शिंदे साहेबांच्या अंतिम आदेशाने अखेरीस आता हा शासन निर्णय दुरुस्त करून पुन्हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
              याबद्दल विद्यार्थी व पालक यांना प्रचंड मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी शासनाचे आभार मानण्यासाठी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सुधारित शासन निर्णय आल्यानंतर आता पनवेलच नव्हे तर राज्यभरातील ओबीसींना या विशिष्ट विषयाकरता मिळणाऱ्या शिष्यवृत्ती चा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रसंगी खासदार आप्पा बारणे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, महानगर संघटक मंगेश रानवडे, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, शाखाप्रमुख प्रतीक वाजेकर, अविनाश साफल्य, उसरली शाखाप्रमुख विवेक घाणेकर, दीपक प्रभू व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन