अंगावर रोमांच उभे करणारी माजी सैनिकांनी सादर केली सैनिकांच्या बलिदानाची शौर्यगाथा ,तळा तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
कृष्णा भोसले
तळा : १५ ऑगस्ट,
तहसील कार्यालय तळा प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण तहसीलदार स्वाती पाटील यांचे हस्ते उत्साहात पार पडला. पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली पी .एस.आय धनाजी काळे व पोलीस दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर सुहास भोईर व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले.
इंग्रजांच्या गुलामी नंतर अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने मोकळा श्वास घेतला आणि भारताच्या भूमीत स्वातंत्र्याचा सूर्य उगवला ब्रिटिशांनी सत्ता भारतीयांच्या हाती सोपवली आणि त्यांनी देश सोडला आणि भारताला आपला आनंद साजरा करता आला तो सैनिकामुळेच.
स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदान आणि त्यागामुळे आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झालो हा दिवस साजरा करीत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरणही केलं जातं.
देशाच्या सीमा सुरक्षित रहाव्यात यासाठी कित्येक सैनिकांनी बलिदान दिलं.काही सैनिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलं. फक्त सीमेवरच नाही तर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमध्येही जवान देश सेवा करीत असतात.
आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या जवानांचं स्वतःचंही आयुष्य असतं पण आपलं कुटुंब दूर ठेऊन अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिलं. अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे. त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या कुटुंबांना समाजाने आधार द्यावा अशी अपेक्षा माजी सैनिक शांताराम शिंदे यांनी व्यक्त केली.
याचा अंगावर रोमांच उभा करणारा प्रसंग सादर केला. यावेळी तळा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, माजी सैनिक, नगराध्यक्षा अस्मिता भोरावकार, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, मुख्याधिकारी माधुरी मडके, नगरसेवक, शिक्षक, शाळेचे विद्यार्थी, तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments