खोपोली नगरपालिकेतर्फे लवजी ग्रामस्थांचा सन्मान
जयवंत माडपे
खोपोली : १६ ऑगस्ट,
"गाव करील ते, राव काय करील", असे पूर्वजांनी सांगितले आहे, त्या म्हणीचा प्रत्यय म्हणजेच खोपोली नगरपालिका हद्दीतील लवजी या गावातील तरुणांनी एकत्र येत सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केल्याने, लवजी गाव तालुक्याच्या नकाशावर आले आहे, गावातील तरुणांनी एकत्र येत गावातील सार्वजनिक विहीर स्वच्छ केली, त्याचप्रमाणे गावात स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात येत असते, दर शनिवारी मंदिरात एकत्र येत हरिपाठ, भजन ,तसेच, संस्कार, सामाजिक एकोपा ठेवण्याबाबतचे संदेश देण्यासाठी मान्यवरांना आमंत्रित केले जाते. गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन शासनाच्या योजना राबविणे, इत्यादी उपक्रम करीत असल्याने दस्तूरखुद्द तहसीलदार आयुब तांबोळी ,मुख्याधिकारी अनुप दूरे व पोलीस निरीक्षक शितल कुमार राऊत व सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळशेकर यांनीही याची दखल घेत या गावाला भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर खोपोली नगरपरिषद तर्फे स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सर्व ग्रामस्थांना आमंत्रित करून स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराने आमची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे यावेळी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे, या पुरस्काराने अधिक जोमाने काम करण्याची आम्हाला प्रेरणा मिळाली आहे असे काही ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.
0 Comments