कोकण क्लबचे अध्यक्ष आज तांबाटी येथे खालापूरातील शेतकऱ्यांच्या भेटीला

 कोकण क्लबचे अध्यक्ष आज तांबाटी येथे खालापूरातील शेतकऱ्यांच्या भेटीला 



 हनुमंत मोरे
वावोशी / खोपोली : २५ ऑगस्ट,

                   कोकणातील शेतकऱ्यांनी संघटीत व्हावे यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचे संघटन करण्यासाठी कोकणातील काही शेतकरी पुढाकार घेत आहेत.आज पर्यंत कोकणातील शेतकऱ्यांची एकजूट न झाल्यामुळे अनेक शासकीय योजनांची माहिती तसेच त्यांचा लाभ घेतांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.शेतकऱ्यांच्या असंघटित पणामुळे शासनाने सुध्दा कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
                 

               कोकणातील शेतकऱ्यांना उद्योग सुरू केला तर त्याला केंद्रशासनाने जाचक अटी घातलेल्या आहेत या अटी शिथिल करण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.यासाठी कोकण क्लबचे अध्यक्ष संदीपजी यादवराव तसेच उत्तर रायगड कार्याध्यक्ष गणेश भगत हे खालापूर तालुक्याला आज  दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता तांबाटी येथे भेट घेणार आहेत तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित रहावे असे आवाहन खालापूरातील शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष मंगेश धामनसे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन