रा.जि.प. शाळा केळवली व वणी येथे शैक्षणिक साहित्य वाटप ,अक्षय मोतीराम दिसले याचा पुढाकार
समाधान दिसले
खालापूर : १६ ऑगस्ट,
शैक्षणिक साहित्य आर्थिक चणचणीमुळे अनेकांना उपलब्ध होत नसल्याने अनेकांच्या शैक्षणिक वाटचालीला ब्रेक बसत असतो, त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक बाधिलकी जपत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असतात, तर याच अनुषंगाने शैक्षणिक साहित्यामुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत केळवली गावातील युवानेते अक्षय मोतीराम दिसले यांच्या माध्यमातून रा.जि.प.च्या शाळा केळवली व वणी येथील १ ली ते ४ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट रोजी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आल्याने यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य पाहायला मिळाले.
खालापुर तालुक्यातील ग्रामीण केळवली युवानेते अक्षय दिसले हे आपल्या गावासह परिसरातील जेष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने व सहकाऱ्यांच्या साथीने सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात देण्याचे प्रामाणिक कार्य करीत असताना हीच सामाजिक बांधिलकी पुढे चालू ठेवत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी केळवली व वणी गावातील रा.जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य पाहायला मिळाले असून युवानेते अक्षय दिसले यांच्या या स्त्युत्य उपक्रमाचे सर्वानी तोंडभरून कौतुक केले आहे.
तर युवानेते अक्षय दिसले यांच्या हातून असेच यापुढेही समाजकार्य घडो यासाठी अनेकांनी त्यांना पाठबळ देत त्यांच्या पुढील उज्वल वाटचालीकरता शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले आहे.याप्रसंगी केळवली व वणी गावातील तरुणाई व ग्रामस्थासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments