सर्वसामान्य जनता ही आजही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठाम उभी असल्याने विजय आपला निश्‍चित आहे. मावळ लोकसभा निरीक्षक प्रणिती शिंदे

 सर्वसामान्य जनता ही आजही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठाम उभी असल्याने विजय आपला निश्‍चित आहे. मावळ लोकसभा निरीक्षक प्रणिती शिंदे



संजय कदम
पनवेल : १५ ऑगस्ट,
  
            भाजपच्या मनमानी कारभाराला आता जनता कंटाळली असून आगामी सर्व निवडणुकीत सर्वसामान्य जनता ही पूर्वीप्रमाणेच काँग्रेस पक्षाबरोबर ठाम उभी राहील, त्यामुळे येणार्‍या सर्व निवडणुुकांत आपला विजय निश्‍चित आहे. फक्त धीर खचू देवू नका, आपआपसातील मतभेद विसरा व एकजुटीने कामाला लागा असे आवाहन आज पनवेल येथे आयोजित पदाधिकारी संवाद मेळाव्यात मावळ लोकसभा निरीक्षक व आमदार प्र्रणिती शिंदे यांनी केले.
               या बैठकीला आ.प्रणिती शिंदे, रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, चारुलता टोकस, रायगड जिल्हा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, किरीट पाटील, कॅप्टन कलावत, मल्लिनाथ गायकवाड, निर्मला म्हात्रे, श्रुती म्हात्रे, हेमराज म्हात्रे, लतिफ शेख, शशिकांत बांदोडकर यांसह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                 यावेळी बोलताना आ.प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, काँग्रेस हा जुना पक्ष आहे. रायगड जिल्ह्यात कॉँग्रेसचे मोठे कार्य आहे. अनेक जण या पक्षात मोठे झाले व पक्ष सोडून गेले. परंतु सर्वसामान्य कार्यकर्ता हा आजही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे आगामी निवडणुुकीत सवार्र्ंनी एकजुटीने काम केल्यास आपला विजय निश्‍चित आहे. देशात राहूल गांधी यांचा प्रभाव वाढत चालला आहे याची भिती भाजपला असल्याने ते वेगळ्या मार्गाने पक्ष फोडण्याचे प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांचे प्रयत्न सफल होणार नाहीत. 
                कार्यकर्त्यांनी धीर धरावा व लोकांमध्ये जावून आपले कार्य सांगावे, आगामी काळात आघाडी कोणाबरोबर होईल त्यापेक्षा आपले उमेदवार कसे जास्तीत जास्त निवडून येतील याकडे लक्ष घाला, आपल्या अडीअडचणी आम्हाला सांगा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोल व मी आपल्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर आहोत. आज येथे जमलेली ताकदच आगामी काळातील विजयाची नांदी दिसत आहे, असेही त्यांनी सांगितले. तर यावेळी मार्गदर्शन करतानना जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी उपस्थितांना सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी ध्येयधोरणे राबविण्याकरिता प्रयत्न करावे. 
         तसेच तळागळात जाऊन कामे करावीत व येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कसे वाढेल यासाठी सर्वांनी मजबुतीने काम करावे.

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव