आयुर्वेदात अनेक गुणांचा समावेश,रामेती येथे तालुकास्तरीय रानभाज्यांचे प्रदर्शन

 आयुर्वेदात अनेक गुणांचा समावेश,रामेती येथे तालुकास्तरीय रानभाज्यांचे प्रदर्शन


पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                                                   खोपोली  : १४ सप्टेंबर,








              पावसाळ्यात जंगलाच्या कुशित निर्माण होणारी रान भाज्या आरोग्यासाठी वरदान ठरत असून,यांचे महत्वे प्रत्येकाला समजावे,शिवाय आपल्या आहारात त्यांचे महत्व अधिक असून या उद्दात विचारांतून रामेती खोपोली येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व आंतरराष्ट्रीय तृणधान्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी विविध प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनास ठेवण्यांस आलेल्या पहावयास मिळाले.  या कार्यक्रमाचे अनावरण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उज्वला बाणखेले,तहसीलदार खालापू - आयुब तांबोळी,उपविभागीय कृषी अधिकारी - नितीन फुलसुंदर, माजी नगरसेवक - अमोल पाटील - खोपोली यांच्या हस्ते करण्यात आले.

             रानभाजी व धान्यापासून बनविण्यात आलेल्या विविध पौष्टिक पदार्थांची पाहणी करून माहिती घेण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत कांचन जाधव  खोपोली यांचा कांचन किचन मसाले, करुणा गायकवाड - महड येथील कर्ण उद्योग हाफ बेक चपाती उद्योग, माधव गावडे जांभिवली यांचा दिव्या डाळ मिल मधील तुरडाळ व बेसन,सुखकर्ता ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी कोपरी यांचा केळी उद्योग व विठ्ठल वैद्य वाघमारे यांच्या औषधी वनस्पती  स्टॉलला भेट देऊन माहिती देण्यात आली.

              (पी.एम.एफ.एम.ई )  व कृषी पायाभूत सुविधा ( ए.आय.एफ ) या योजने बाबद  महेश बोराडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया चे अधिकारी यांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड तसेच प्रकल्प अहवाल तयार करताना घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.तसेच रानभाजी ओळख व आहारातील रानभाजी चे महत्व या विषयावर डॉ.राजेंद्र सावळे प्रादेशिक संशोधन केंद्र कर्जत यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास पौष्टिक तृणधान्य व रानभाजी महोत्सव मध्ये सहभाग घेतलेल्या शेतकरी महिला शेतकरी व बचत गट यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.    

                          माननीय उज्वला बाणखेले यांनी शेतकऱ्यांना G20 शिखर परिषद कार्यक्रम व विविध योजनेचे मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, जे के देशमुख मंडळ कृषी अधिकारी खालापूर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  तालुका कृषी अधिकारी खालापूर- सुनील निंबाळकर  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.भारती दिलीप कातकरी, नडाळवाडी यांची कृषी विभागामार्फत उज्वला बाणखेले  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रानभाजी माहिती पुस्तिका व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

खोपोली,खरसुंडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश