नढाळ आदिवासीवाडी व नढाळ ठाकूरवाडीतील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप , ग्रामपंचायत सदस्या भारती सचिन चाळके यांचा पुढाकार

 नढाळ आदिवासीवाडी व नढाळ ठाकूरवाडीतील  शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप , ग्रामपंचायत सदस्या भारती सचिन चाळके यांचा पुढाकार 




पाताळगंगा न्यूज : ( समाधान  दिसले )
खालापूर : १५ सप्टेंबर, 

           शैक्षणिक साहित्य आर्थिक चणचणीमुळे अनेकांना उपलब्ध होत नसल्याने अनेकांच्या शैक्षणिक वाटचालीला ब्रेक बसत असून शैक्षणिक साहित्यामुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून खालापूर तालुक्यातील नढाळ ग्रामपंचायतीच्या सदस्या भारती सचिन चाळके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रा.जि.प शाळा नढाळ आदिवासीवाडी व नढाळ ठाकूरवाडीतील १  ली ते ४  वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
                  यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य पाहायला मिळाल्याने असून शैक्षणिक साहित्य वाटपातून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यात उर्जा मिळाली तर ग्रामपंचायत सदस्या भारती सचिन चाळके यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास चालना दिल्याने ग्रामपंचायत सदस्या भारती सचिन चाळके यांच्या स्त्युत उपक्रमाचे कौतुक होत आहे.
           याप्रसंगी उपसरपंच समीर दळवी, सामाजिक कार्यकर्ते रामदास पवार, मंगेश पवार, ॲड.सचिन चाळके, हर्षल दळवी, रितेश भोईर, रोहिणी सावंत, ज्योती सावंत, आश्विनी चाळके, कांचन चाळके, भारती कातकरी, मंगल चाळके, शिक्षक शिंदे, कदम, केदारी आदी प्रमुखासह विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 
            तर नढाळ आदिवासीवाडी व नढाळ ठाकूरवाडी रा.जि.प.शाळेत शिक्षण घेण्यास चालना दिली आहे. तर या साहित्य वाटपातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला असून ग्रामपंचायत सदस्या भारती सचिन चाळके यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमानी साजरा करीत सामाजिक बाधिलकी जपल्याने चाळके यांच्या कामगिरीचे कौतुक होतानाचे पाहायला मिळत आहे.
  

चौकट 
 
          आपण ज्या समाजात जन्म घेतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, हे उदिष्ट डोळ्यासमोर प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे. तर सामाजिक बांधिलकीतून अनेकांना मदत होईल. तर नढाळ आदिवासीवाडी व नढाळ ठाकूरवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केल्याने यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला असून हाच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पुढील काळात अधिक सामाजिक काम करण्यास ऊर्जा देऊन गेला आहे. ( भारती सचिन चाळके  ग्रामपंचायत सदस्या - नढाळ)

Post a Comment

0 Comments

खोपोली,खरसुंडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश