वावेहवेली येथे खोडकिडा नियंत्रणा बाबत मार्गदर्शन

 वावेहवेली येथे खोडकिडा नियंत्रणा बाबत कृषि अधिकारी मार्गदर्शन,शेताच्या बांधावर शेतकऱ्यांची घेतली कृषि शाळा

     


पाताळगंगा न्यूज ( कृष्णा भोसले )
तळा : १३ सप्टेंबर,

            वावे हवेली येथे भात पिकावर पडलेल्या खोडकिडा, करपा ई. कीड व रोग बाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. खोडकिडा नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% ई.सी प्रवाही २५ मि.ली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा कॉरटॉप हायड्रोक्लोराइड ४% दाणेदार ६ किलो/एकर प्रमाणे वापर करावा.. तसेच करपा रोगासाठी ट्रायसाक्लोझोल ७५  % डब्ल्यू.पी. १० ग्रॅम /प्रति १० लि.पाण्यात फवारणी करावी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट ५ ग्रॅम/ दहा लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला.

             तसेच कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत भात पिकाचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाची भित्तीपत्रके समाज मंदिर वावे हवेली येथे लावण्यात आले..यावेळी शेती शेती शाळेचा ४ था वर्ग घेण्यात आला. शेतीशाळेत शिवार फेरी घेण्यात आली व बाळू रामजी वारंगे यांच्या नियंत्रित प्लॉट येथे भात पिकाचे कीड व रोग व त्यांच्या  व्यवस्थापनाबाबत कृषी पर्यवेक्षक,जितेंद्र गोसावी व कृषी सहाय्यक योगेश कोळी यांनी मार्गदर्शन केले

Post a Comment

0 Comments

खोपोली,खरसुंडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश