खोपोली,खरसुंडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश

 भारतीय जनता पार्टी खालापूर महड येथे आढावा बैठक,खोपोली,खरसुंडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : २३ सप्टेंबर,

                 गोवा राज्याचे मुरगाव विधानसभेचे आमदार  संकल्प अमोनकर यांच्या उपस्थितीत आज महड येथे खालापूर तालुका भाजपा मंडळाची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मनातल्या वेदना त्यांच्या समोर मांडत युतीचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मागील ५ वर्षात कशाप्रकारे वागूणूक दिली याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.यामुळे भाजपा युवा वाॅरिअर्स रायगड जिल्हा सहसयोजक अभिषेक कदम व युवा वाॅरिअर्स तालुका संयोजक अक्षय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली व खरसुंडी येथील कार्यकर्त्यांनी गोवा विधासभेचे आमदार संकल्प आमोनकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
               महायुतीचा धर्म काय प्रत्येक वेळी भाजप कार्यकर्त्यांनीच पाळायचा का?असा प्रश्न उपस्थित करत जे काही होईल ते होईल पण यावेळी कर्जत खालापूर विधानसभेला भाजपचाच उमेदवार हवा असे कार्यकर्त्यांनी उपस्थित पदाधिकारी यांच्याकडे मनोगत व्यक्त केले.
              यावेळी उत्तर रायगड सरचिटणीस दीपक बेहरे , रायगड विधानसभा निवडणूक प्रमुख किरणजी ठाकरे तसेच , उत्तर रायगड जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष अतुल बडगुजर , उपाध्यक्ष उत्तर रायगड  सनी यादव , कर्जत मंडळाचे अध्यक्ष  राजेश जी भगत , जिल्हा परिषद माजी सदस्य, नरेशजी पाटील , फ्रेंड्स ऑफ बीजेपी व खालापूर विधानसभा संयोजक नितीनजी कांदळगावकर, युवा मोर्चा खालापूर अध्यक्ष  नागेश पाटील , कर्जत खालापूर युवा मोर्चा विधानसभा प्रमुख प्रसाद पाटील,खालापूर शहराध्यक्ष  दीपक जगताप ,खालापूर तालुका सरचिटणीस  आबासाहेब देशमुख ,रायगड जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष  जगदीश आगिवले , आतकरगावचे माजी सरपंच  संदीप पाटील , भारतीय जनता पार्टी महिला पदाधिकारी श्वेता ताई मनवे ,वत्सलाताई मोरे, यशोदाताई मोरे, राखीताई गणेशकर,कर्जत विधानसभा विस्तारक  हेमंत नांदे जी खालापूर मंडळाचे सर्व नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       आढावा बैठक येथे पक्ष प्रवेश केलेले कार्यकर्ते 
साहिल भिसे, राज उतेकर, संकेत बारस्कर,अनिकेत बारस्कर, मंदार बारस्कर,सागर वाघमारे, कल्पेश पवार,प्रथमेश साळुंखे,सिद्धेश शिंदे सर्व खरसुंडी गाव तसेच स्वतेज बागराव, अतुल लांबे,रोहित गस्ती, निर्भय पवार, राजेश पाटील, सार्थक हिंदुराव, ररूल नदाब,कुशल तेलवणे, अथर्व सुर्वे, सूरज बायस, दर्शन लांबे, रोहन भऊड, कुमार राठोड, चेतन गांभे या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर