चौक बाजार पेठेत बांबुच्या काठीपासून बनविलेली मखर ची गणेश भक्तांना भुरळ

 चौक बाजार पेठेत बांबुच्या काठीपासून  बनविलेली मखर ची  गणेश भक्तांना भुरळ 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
चौक  : १५ सप्टेंबर,

            राज्य सरकारने पाच वर्षी पुर्वी थरमॉकॉल बंद करण्याचा निर्णय घेतल्या व्यवसायीकाने आपला उद्योग कापडी मखर, बांबुच्या काठीपासून बनविण्याकडे वळविला आहे. गणरायाच्या अगमनासाठी तीन आठवड्यांचा कालावधी असतांना मखर बाजारपेठत उपलब्ध झाल्या आहेत.सहा महिने अधिच मखर  बनविण्याचा उद्योग सुरु असून निसर्गात सहज उपलब्ध होणारे बांबु या पासून मोठ्याप्रमाणावर विविध प्रकारे नक्षीकाम करुन मखर तयार करुन विक्रीस  ठेवण्यात आली असून.३००० पासून ते १०,००० रुपये पर्यंत मखर विक्रीस ठेवण्यात आली असल्याचे चौक येथिल कारागीर  शेळके यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.                                               या वर्षी बाजार पेठेत मोठ्याप्रमाणात नक्षीकाम केलेल्या बांबु पासून  डायमंड विको फ्रेंडली च्या रेडीमेड मखर उपलब्ध झाल्या असून,गणेश भक्तांच्या मागणी नुसार मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असल्यांचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.उत्तम कलाकुसर व उत्तमरीत्या सजवलेली ही मखर भक्तांचे आकर्षण केंद्रबिंदू ठरत असून,मागणी नुसार ऑडर स्विकारली जात असल्यांचे येथिल व्यवसायिक शेळके यांनी सांगितले.                                                                           विविध प्रकारचे आकर्षक देखावे व गणरायाला साजेशी सजावट करण्यावर भाविकांचा भर असल्याने विविध प्रकारच्या मखरांना मोठी मागणी आहे.गणेशोत्सवाला अवघे काही तासांचा अवधी असताना तयारीला उधाण आलेले असून वेळीची बचत व्हावी या उद्देशाने तरुणाई आज प्रत्यक्ष कलाकुसर करण्यापेक्षा रेडिमेड मखरांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.यामुळे गणरायाच्या अगमनांचे सर्वांनाच वेध लागले आहे.                                                

चौकट : 

निसर्गात सहज उपलब्ध होणारे बांबु यांचा वर नैसर्गिक रंग तयार करुन त्यावरती डायमंड तसेच बांबु चटई सुंदर अशी मनमोहन मखर तयार करुन विक्रीस ठेवली आहे.३००० रूपये पासून ते १०,००० रुपयांपर्यंत मखर विक्रीस ठेवण्यात आली आहे ( कारागीर व्यवसायिक चौक रोहीदास शेळके )

Post a Comment

0 Comments

शासनमान्य खालापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा  संपन्न