शासनमान्य खालापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न

 शासनमान्य खालापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा  संपन्न






पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : २४ सप्टेंबर,

          क्रीडा व युवक सेवासंचलनालाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय - रायगड अलिबाग आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय खोपोली जिमखाना हॉल येथे केले होते.
या स्पर्धेत खोपोली सह खालापूर तालुक्यातील वीसहून अधिक शाळेतील १५० कुस्तीपटूनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
              या स्पर्धेच्या उदघाटन समारंभाचे वेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबू जळगावकर, बांधकाम व अर्थ सभापती यशवंत साबळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे, मुख्याध्यापक पीजी देशमुख, उपमुख्याध्यापक हेमंत खाडे, जेष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार, मितेश शहा, संजय शिर्के,प्रा जयवंत माने आदी मान्यवर उपस्थित होते.
           या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय पंच सावळेराम पायमोडे, रोशनी परदेशी, दिवेश पलांडे, विनोद जाधव, ओंकार निंबळे यांनी मोलाची कामगिरी बजावली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जेष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार, प्रार्थना भोपातराव, बुवा यांनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेतील विजयी कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Post a Comment

0 Comments

शासनमान्य खालापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा  संपन्न