कळंबोलीत महिलांचा शिवसेना प्रवेश! जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, कुंदा गोळे यांनी केले स्वागत

 कळंबोलीत महिलांचा शिवसेना प्रवेश! जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, कुंदा गोळे यांनी केले स्वागत



पाताळगंगा न्यूज : ( संजय कदम )                         पनवेल : १० सप्टेंबर,

        

          पनवेल परिसरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकुशलतेवर प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. शनिवारी कळंबोली शहरातील महिलांनी हातात भगवा झेंडा घेऊन सेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे आणि कुंदा गोळे यांनी त्यांचे स्वागत केले.                             गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामाचा झंजावत सुरू केला आहे. सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. राज्यातील सर्व जनतेला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सुरक्षा कवच दिले आहे. ही मर्यादा पाच लाखांपर्यंत केली आहे. त्याचबरोबर सर्व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देऊन या सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.                                                                                     महिला सबलीकरण व सक्षमीकरण त्यांच्या सुरक्षिततेसाठी ए डी ए सरकार प्रभावी काम करत आहे. परिणामी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनावर महिला वर्ग बेहद खुश आहे. संपूर्ण राज्यात शिवसेनेमध्ये विशेषतः महिला वर्गाचा प्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहे. कळंबोलीत सुद्धा अनेक भगिनींनी सेनेत काम करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पक्ष पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.                                                                                 रामदास शेवाळे यांनी सर्वांचे स्वागत करून आगामी काळात सर्व महिला कार्यकर्त्यांना मान आणि सन्मान दिला जाईल. त्याचबरोबर त्यांना पक्षाकडून उचित जबाबदारी दिली जाणार असल्याचेही सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सुरुवात असलेली घोडदौड त्याचबरोबर पक्षाची ध्येय धोरणे ही शेवाळे यांनी विशद केले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख कुंदा गोळे , पनवेल तालुका प्रमुख भरत जाधव,महिला तालुकाप्रमुख संध्या  पाटील,  कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक,महिला कळंबोली शहर प्रमुख ज्योती  पाटील , पनवेल उपशहर प्रमुख मचींद्र झगडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खोपोली,खरसुंडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश