पनवेलच्या पत्रकारांनी घेतली गोव्यातील श्री मंगेशी देवस्थानच्या सचिवांची सदिच्छा भेट

 पनवेलच्या पत्रकारांनी घेतली गोव्यातील श्री मंगेशी देवस्थानच्या सचिवांची सदिच्छा भेट



पाताळगंगा न्युज : ( संजय कदम )
पनवेल : १० सप्टेंबर,

           ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी गोवा सज्ज होत आहे. ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. नुकतेच पणजी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण संपन्न झाले. या सोहळ्यासाठी पनवेलच्या पत्रकारांना विशेष निमंत्रित म्हणून पाचारण केले होते. या बातमीच्या वृत्तांतनासाठी गोवा येथे गेले असता पनवेलच्या पत्रकारांनी श्री मंगेशी देवस्थानाच्या विश्वस्त समितीचे सचिव अरुण नाडकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली.
                   अरुण नाडकर्णी यांनी पनवेल मधील विशेष निमंत्रित पत्रकार बांधवांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि  भगवान श्री मंगेश यांचा प्रसाद देऊन सन्मान केला. यावेळी नाडकर्णी यांनी श्री मंगेशी देवस्थान यांच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित विशेष जत्रेमध्ये पनवेलच्या पत्रकार बंधूंना सहकुटुंब येण्याची विनंती केली.
              ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या बोधचिन्हाचे आणि क्रीडापटूंना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच खेल भावना जागृत करण्याच्या उद्देशाने मोगा या शक्तिशाली वृषभ रूपाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पर्धेच्या आयोजना संदर्भात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहभागा संदर्भात उपस्थित पत्रकार बांधवांना अवगत केले.

Post a Comment

0 Comments

दुर्गम भागामध्ये आरोग्य तपासणी एटीजी हेल्थ केअर सामाजिक संस्थे चा पुढाकार