जागतिक पौष्टीक तृण धान्य प्रदर्शनात खालापूरच्या महिलेचा सहभाग,विविध प्रकारचे लाडू चे केले प्रदर्शन

 जागतिक पौष्टीक तृण धान्य प्रदर्शनात खालापूरच्या महिलेचा सहभाग,विविध प्रकारचे लाडू चे केले प्रदर्शन





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर : १० सप्टेंबर


                G - २०  शिखर परिषद नवी दिल्ली येथे जागतिक पौष्टीक तृणधान्य प्रदर्शनात विविध देशांच्या राष्ट्र प्रमुखांसह पाचशे नामांकित व्यक्ती,उद्योगपती यांच्या उपस्थितित होत. जगभरातील अनेक महत्वाच्या देशांच्या पंतप्रधान व राष्ट्रअध्यक्ष यांच्या पत्नीनी भेट दिली असल्यांचे समजते. देशभरातील अनेक राज्यातून तृण धान्य लागवड करणारे शेतकरी ,उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, कृषि अधिकारी,कृषि व संलग्न विषयाची विद्यापीठे व संस्था यांचा लक्षणीय सहभाग होता.यावेळी खालापूर तालुक्यातील नढाळवाडी येथिल महिला वर्गांनी लाडु चे महत्व आणी प्रदर्शन करण्यात आले.


                  या प्रदर्शनामध्ये  मध्यप्रदेश  मधील मांडला जिल्ह्यातील लहरिबाई यांनी तृण धान्याच्या १५०  हुन अधिक जातीचे जतन केले, त्यांचे कार्य शेतकरी वर्गांसाठी  कौतुकाचा विषय ठरला आहे, तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दोन महिलांना मिळाली आहे. या पैकी एक महिला खालापूर तालुक्यातील नढाळवाडी गावच्या  भारती दिलीप कातकरी यांचा समावेश आहे त्यांनी विविध प्रकारच्या लाडवांचा स्टॉल लावला होता यामध्ये नाचणी लाडू ,बेसन लाडू ,रवा लाडू  अशा पौष्टीक लाडवांचा समावेश होता, 

               केंद्रीय मसाला पिके संशोधन संस्था, राष्ट्रीय दूध विकास संस्था -कर्नाटक , राष्ट्रीय पुष्प उत्पादन संस्था पुणे व भारतीय कृषि अनुसंधान संस्था दिल्ली.अशा राष्ट्रीय पातळीवरील  वेगवेगळ्या संस्था व त्यांनी संशोधन केलेल्या तंत्रज्ञान व संशोधनाची व कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा व हायड्रोपोनिक  तंत्रज्ञानाचा वापर आशा वेगवेगळ्या स्टॉलची माडणी करण्यात आली होती. यावेळी विविध देशांच्या पंतप्रधान व राष्ट्र अध्यक्ष यांच्या पत्नी यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला यावेळी यांचे सत्कार करण्याचे मान महाराष्ट्र राज्याला मिळाला,

         अनिता योगेश माळगे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी ओ सोनक यांची मिसेस, इटली प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी याचे सत्कार समारंभ हिच्या हस्ते करण्यात आले.व साऊथ कोरिया पंतप्रधान यांची पत्नी युन सिक व ओयोल व इमाणुल मॅक्रॉन फ्रान्स   यांची पत्नी यांचा सत्कार रायगड जिल्ह्यातील ,खालापूर तालुक्यातील नढाळवाडी येथील भारती  दिलीप कातकरी यांनी केला.

             महाराष्ट्र राज्यातून रणरागिणीना G २०  शिखर परिषदमध्ये निवड व सहभागी होण्यापर्यंत .अनुप कुमार सर (अपर मुख्य सचिव कृषी) सुनील  चव्हाण(आयुक्त कृषी) विकास पाटील सर (संचालक निविष्ठा व गुणनियंत्रक)  दशरथ तांभाले सर(संचालक आत्मा) अंकुश माने सर ( विभागीय कृषी सहसंचालक, ठाणे) रफिक नाईकवाडी सर(विभागीय कृषी सहसंचालक, पुणे), योगेश म्हसे ( जिल्हाधिकारी  रायगड ) दत्तात्रय गावसाने (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर) उज्वला बाणखेले( जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड),मदन मुकणे (आत्मा प्रकल्प अधिकारी,सोलापूर) लालासाहेब तांबडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ के.व्ही.के , सोलापूर) मा.श्री.नितीन शेळके (नाबार्ड डी.डी.एम सोलापूर )  मा. नितीन फुलसुंदर (उपविभागीय  कृषी अधिकारी,खोपोली) , सुनील निंबाळकर (तालुका कृषी अधिकारी,खालापूर) मा,जगदीश देशमुख (मंडळ कृषी अधिकारी ,खालापूर). नितीन महाडिक ( कृषी पर्यवेक्षक,चौक) ,सुमित भगत ( कृषी सहाय्यक,चौक) प्रज्ञा पाटील ( बी.टी.एम.रायगड) यांनी  सर्वतोपरी  सहकार्य  अणि  वेळोवेळी मार्गदर्शन  केले.

Post a Comment

0 Comments

खोपोली,खरसुंडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश