श्री कृष्णाची भुमिका परिधान करुन विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी

 श्री कृष्णाची भुमिका परिधान करुन विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                                    वाशिवली : ६ सप्टेंबर 

               शाळा ही विद्यार्थ्यांना विविध सणांची माहिती देत असते.शिवाय विविध सण आपण कसे साजरे करावे यांचे प्रात्येशिके सुद्धा घेतली जाते.भारतीय संस्कृती मध्ये येत असलेल्या सणांचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी गोपाळकाला  हा सण सौ.विमलाताई पारनेरकर सेमी इंग्लिश प्राथमिक विद्या. वाशिवली येथिल शिक्षकांच्या सहकार्याने दहीहंडी हा सण साजरा करण्यात आला.यासाठी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारण्यात आली.श्रीकृष्ण,राधा,तसेच त्यांचे सवंगडी यांची भूमिका साकारण्यात आली.यासाठी दहीहंडी उभारण्यात आली.                                                              ढोलकीच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरत ही फोडण्यात आली.संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा होत असतांना दहीहंडी फोडण्यासाठी अनेक ठिकाणी उंच अशी मनोरे उभे केले जात असतात.त्याच बरोबर मोठ्याप्रमाणावर बक्षिसे सुद्धा लावली जात असतात.मात्र विद्यार्थ्यांना यांचा आनंद लुटता यावा यासाठी कमी उंचीची दहीहंडी बांधण्यात आली.आणी श्रीकृष्णाची भुमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.                                                                                  गोपालकाला सण शाळेमध्ये साजरा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळेचे हावभाव पहावयास मिळत होते.प्रत्येक विद्यार्थ्यांनी विविध रंगीबेरंगी कपडे तसेच श्रीकृष्णाचे सवंगडी म्हणून वेशभूषा साकरलेली पहावयास मिळाली.यावेळी या कार्यक्रमास या संस्थेचे अध्यक्ष : तुळशिदास पाटील,अनंता दळवी,अनंता भोईर,मुख्याध्यापक मिनाक्षी रणदिवे,सह शिक्षिका कल्पना गव्हाणे,संजीवनी म्हात्रे अपर्णा जाधव,निकिता  म्हात्रे अदि उपस्थित होते.


कोट 

        विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती मध्ये येत असलेल्या प्रत्येक सणांची माहिती उपलब्ध व्हावी,शिवाय हे सण आपण साजरा करण्याबद्दल कारण काय? यांचे मार्गदर्शन करत असतो,पण  सण म्हटले उत्साह आणी आनंदाने एकत्र येत असतो  सौ.विमलाताई पारनेरकर सेमी इंग्लिश प्राथमिक विद्या वाशिवली मुख्याध्यापिका -  मिनाक्षी रणदिवे 






Post a Comment

0 Comments

स्वच्छता विषयी पथनाट्य,राजिप शाळा वडगांव यांचा स्तुत्य उपक्रम