लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे शिक्षक दिनानिमित्त तक्का शाळेतील शिक्षकांचा सन्मान क्लब

लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे शिक्षक दिनानिमित्त तक्का शाळेतील शिक्षकांचा सन्मान 



संजय कदम ( पाताळगंगा न्यूज )
पनवेल : ६ सप्टेंबर,


          लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून तक्का प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि वृक्षारोपण करण्यात आले. 
         सर्व वह्या ह्या विजय गणात्रा यांचे तर्फे देण्यात आल्या. प्रमुख पाहुणे मुकेश तनेजा यांनी सरगम क्लबच्या कार्याबद्दल कौतुक केले आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी प्रांतपाल ला. मुकेश तनेजा, ट्वींनिग कमिटी चे ला. विजय गणात्रा, चाईल्ड कॅन्सर कमिटी चे ला. संजय गोडसे तसेच सरगम क्लबच्या अध्यक्ष स्वाती गोडसे, खजिनदार अलकेश शहा, प्रेमेंद्र बहिरा, सुनील देशपांडे, संयोजक संदीप ठाकूर, तक्का शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या सावळे आणि शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक स्वाती गोडसे यांनी केले तर सूत्र संचालन वैभव पाटील यांनी केले. 

Post a Comment

0 Comments

स्वच्छता विषयी पथनाट्य,राजिप शाळा वडगांव यांचा स्तुत्य उपक्रम