कर्जत - खालपुरातील राष्ट्रवादीची ताकत वाढली, बलाढ्य कार्यकर्त्यानी हाती बांधले घड्याळ,
(खालपुरातील बाराशे हुन अधिक कार्यकर्ते राष्ट्रवादी मध्ये सामील)
पाताळगंगा न्युज : हनुमंत मोरे
खोपोली , वावोशी : २२ सप्टेंबर
कर्जत खालापुरातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी च ठरल सुधाकर घारे घेतील तो धोरण आणि बांधतील तो तोरण कोणत्याही परिस्थितीत घारे यांना आमदार करण्यासाठी नुकताच युकेज रिसॉर्ट मध्ये झालेल्या राष्ट्रवादी च्या सर्वसाधारण सभा घेण्यात आल्याने या सभेचे रूपांतर जाहीर सभेत झाल्याने खालापुरातील ११ गावातील बाराशेहुन अधिक विविध पक्षातील बलाढ्य कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा खाद्यावर घेत सुधाकर घारे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. कर्जत खालापुरात महायुती मध्ये असणारे शिंदे गट व अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आता महायुती कोणाला तिकीट जाहीर करेल याकडे लक्ष लागले असले तरी महायुती तील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहवयास मिळणार आहे, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत तिकीट राष्ट्रवादीचे घारे यांनाच उमेदवारी मिळणार आणि जिंकणार ही असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे . यावेळी राष्ट्रवादी चे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे राष्ट्रवादी चे सरचिटणीस दत्ताजी मसुरकर, प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव , भरत भगत, उल्हास भुर्के, भगवान भोईर शरद कदम,तालुका प्रमुख संतोष बैलमारे,युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे,महीला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे , विधानसभा अध्यक्ष सुरेखा खेडकर, जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे,तालुका कार्यध्यक्ष भूषण पाटील , खोपोली शहराध्यक्ष मनेश यादव, कमाल पाटील , रमेश जाधव शहर अध्यक्षा वैशाली जाधव ,महिला तालुकअध्यक्षा प्राची पाटील, उपजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, मनीष यादव , रमेश जाधव , संतोष गुरव ,शेखर पिंगळे,भूषण पाटील,कुमार दिसले,अरुण पाटेकर,अमित देशमुख,अमोल पाटील,बाबू पोटे,मोहन केदार अजीम कारजिकर यासह अन्य मान्यवर उपस्थित होते त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अशोक भोपतराव यांनी सुधाकर घारे घेतील तो धोरण व बांधतील तो तोरण असा निर्णय जाहीर करताच हजारो कार्यकर्त्यानी या निर्णयाला घोषणाबाजी करीत जाहीर पाठिंबा दिला आहे. खालापूर तालुक्यातील कर्जत मतदार संघात साजगांव व सावरोली हे दोन जिल्हा परिषद व आर्धा चौक जिल्हा परिषदेचा भाग समाविष्ट आहे या साठी ही सर्वसारण सभा जाहीर करण्यात आली होती मात्र या सभेत हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभल्याने ही सर्वसाधारण सभेचे जाहीर सभेत रूपांतर झाल्याने या सभेत ढोलताशांच्या गजर करीत राष्ट्रवादी चे झेंडे खांद्यावर घेत शिवसेना शिंदे गटाचे नावंडे ग्राम पंचयतिचे माजी सरपंच रोहिदास पिंगळे माडप चे मनसेचे नेतृत्व सतिष घोडविंदे व चार ग्राम पंचयत सदस्य घोडीवलीचे आय काँग्रेस पक्षाचे नेते माजी सरपंच संजय पिंगळे, अनंता हडप ,गोरठण बुद्रुक मंगेश काईंकर होणाड ,आतकरगाव, वावोशी,नावंडे, केलवली,चींचवली आडोशी ,वडवळ, जांबरुंग ठाकूरवाडी. टेंबेवाडी, होनाड, यासह त्याच्या समवेत बाराशेहून अधिक कार्यकर्ते या सभेच्या निमिताने झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी मध्ये सामील झाल्याने कर्जत खालापूर च्या राजकारणाला कलाटणी मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याने राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे चित्र आहे या सभेच्या दरम्यान भविष्यात या कर्जत खालापूर मधील हुकूमशाही ,दादागिरी,घालवून या कर्जत खालापूर मतदार संघाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे तो आपल्याकडून मिळेल असा विश्वास घारे यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments