खोपोलीतील सिध्दांत शेलार यांच्यावर युवासेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी

 खोपोलीतील सिध्दांत शेलार यांच्यावर युवासेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी ,आमदार महेंद्र थोरवेच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : ३ सप्टेंबर,


            खोपोली शहरातील शिवसेनेचे युवानेते तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सिद्धार्थ उर्फ सोनू शेलार यांची 2 सप्टेंबर रोजी युवासेनेच्या रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आल्याने सिद्धार्थ शेलार यांच्यावर अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे, तर या आशयाचे नियुक्तीपत्र कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, युवासेना जिल्हा अधिकारी जयेंद्र देशमुख यांच्या हस्ते खोपोलीतील युवा संवाद विशेष बैठकीत 3 सप्टेंबर रोजी देण्यात आले.
                    याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना संपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, युवासेना जिल्हा आधिकारी जयेंद्र देशमुख, सचिव संदीप भोईर, विधानसभा संघटक प्रितेश मोरे, युवासेना विधानसभा अध्यक्ष प्रसाद थोरवे, संपर्कप्रमुख पंकज पाटील, संपर्कप्रमुख संजय देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश पाटील, युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे, शिवसेना शहरप्रमुख संदीप पाटील, युवासेना अधिकारी संतोष मालकर, शिवसेना शहर संघटक तात्या रिटे, संपर्कप्रमुख हरीश काळे, समन्वयक राजू गायकवाड, अमोल जाधव, दिनेश थोरवे, चंद्रकांत फावडे, मोशिन शेख, राकेश फावडे, अमित जगताप, ईश्वर शिंपी, राहुल गायकवाड, मंगेश मोरे, सचिन महाडिक आदी प्रमुखांसह शिवसेना - युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
               शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघांचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात नवनियुक्ती जाहीर करत पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना विशिष्ट पदावर वर्णी लावण्यात येत असताना खोपोली शहरातील युवा नेतृत्व सिद्धार्थ शेलार यांनाही पक्षात बढती मिळाल्याने त्यांची युवासेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदी वर्णी लावत त्यांनी केलेल्या कामाची त्यांना पोचपावती मिळाल्याने शेलार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
                 खोपोली शहरातील सिद्धार्थ उर्फ सोनू शेलार यांनी आजवर विवीध क्षेत्रात काम करीत सामजिक बांधीलकी जपण्याचे काम केल्याचे पाहायला मिळाले असता सिद्धार्थ शेलार यांनी शिवसेना पक्षाचे काम आजवर  करून पक्ष संघटना मजबुत करण्याचे काम केल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या याआधी दिला असता त्यांनी केलेल्या आजवरच्या कामाची दखल घेत त्यांची रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आल्याने सिद्धार्थ शेलार यांच्यावर अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे, तर या आशयाचे नियुक्तीपत्र खोपोलीतील युवा संवाद विशेष बैठकीत देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,