संघर्षातून निर्माण झालेली नवदुर्गा : ज्योती दिपक अवघडे

 शिक्षणाची ज्ञानगंगा  सर्वसामान्यांपर्यंत  पोहचविणारी, संघर्षातून निर्माण झालेली नवदुर्गा : ज्योती दिपक अवघडे 







पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
कामार्ली :  १६ ऑक्टोबर, 
संकलन : सुभाष राठोड - राजिप शाळा वडगांव 


                   शाळेची २ विद्यार्थ्यी संख्येवरून कशी झाली २५ विद्यार्थी संख्या...ती पण फक्त दोन महिन्यात...आजपर्यंत अनेक शाळाबाह्य मुलं कशी आली शिक्षणाच्या प्रवाहात आनली गेली. आपल्या मनात जर जिद्द असेल तर नक्कीच आपण अशक्य ते शक्य करू शकतोत. पण त्यासाठी हवीय जिद्द, चिकाटी, काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती, ध्येयाने झपाटले पाहिजे. जोपर्यंत आपल्या कामाची तहान भागत नाही, अगदी तोपर्यंत. आणि ज्ञानदानची ,ग्रहण करण्याची तहान मला तरी वाटते कि,कधीच भागात नाही किंबहुना आपण याबाबतीत संतुष्ट, समाधानी होत नाहीत. मी तर असे म्हणेन की याबाबतीत सदैव असमाधानी राहुन सदैव ज्ञानदानाचे आणि ज्ञानग्रहणाचे पवित्र कार्य करत राहिले पाहिजे... अशाच एका ज्ञानज्योतीच्या कार्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पद दलित
तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे या आदरणीय, पुज्य साने गुरुजींच्या मानवतेचा संदेश देणार्या प्रार्थनेतील ओळी आपण अगदी पहिल्या वर्गापासून ऐकत, वाचत आलेलो आहोत. पण आपण खरचचं साने गुरुजींनी सांगितलेल्या विचारांचा प्रसार तसेच प्रत्यक्ष या जीवनात उतरवले आहे काय...? तसे पहायला गेले तर या विचारांप्रमाणे काम करणारे अनेक लोकं आहेत. अशाच एका साने गुरुजी, राष्ट्रसंत गाडगेबाबा, विश्वगुरू संत तुकाराम महाराज यांच्या विचारांच्या पाईक असणाऱ्या सौ.ज्योती अवघडे यांची शिक्षणाची घडपड असणारी गौरवपूर्ण माहिती घेऊया...




पार्श्वभूमी

               सौ. ज्योती अवघडे यांचे मुळगाव सुधागड पाली हे होय. वडील वनविभागात कार्यरत असल्यामुळे अनेकदा नौकरीघ्या निमित्ताने बदली होत राहयाची त्यामुळे शिक्षण पण असेच कधी या गावी तर कधी त्या गावी झाले. चुलते एस.टी.महामंडळात असल्यामुळे ते सदैव वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक मार्गदर्शन करायचे त्यांच्या चुलत्यानेच त्यांना बारावीच्या नंतर शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली व त्यांनी प्रथमतः डि.एडला प्रवेश घेतला यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यानंतर त्या शिक्षिका म्हणून शाळेवर रूजू झाल्या...शाळेत प्रथम एक वर्ष हायस्कूल च्या मुलांना शिकवल्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी शासनाची आदिवासी आश्रम शाळा येथे 2000 साली हजर झाल्या आणि काही वर्षांनी जिल्हा परिषदेकडे वर्गीकरण करून जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्या तेव्हापासून स्वतःला कामात त्यांनी झोकून देऊन काम केलं 

                  बालरक्षक म्हणून केलेलं काम
               डिसेंबर 2018 ला   अंतोरे फाट्याजवळ जवळपास ३० च्या आसपास मुलं खेळतांना दिसली, त्यावेळी माझ्या मनात विचार आला कि,हि मुलं खरचचं शाळेत जात असतील का...? मी दुसऱ्या दिवशी कामावर सुट्टी टाकून त्या झोपडपट्टीत भेट द्यायला गेले तेंव्हा, ती मुलं आईवडीलांच्या सोबत कामानिमित्ताने स्थलांतरित झाले होते. त्यांची संपूर्ण माहिती घेतली व राज्याच्या बालरक्षक समन्वयक मा.नुतनजी मघाडे मँम यांना सविस्तर माहिती दिली...
  त्यानंतर ज्योती अवघडे त्या पालावर गेल्या व त्यांना तिथे जवळपास ४० मुलं शाळाबाह्य आढळून आली (त्यापैकी ३६ मुलं पात्र होती.)  पुढे त्यांनी त्या विद्यार्थ्यांना रा.जि.प.शाळा अंतोरे येथे विविध अडचणींना सामोरे जात येथे दाखल केले. त्यावेळी त्या सर्व मुलांना त्यांनी शालेय साहित्य भेट दिले...


 त्या विद्यार्थ्यांना शाळेत नेआण करण्यासाठी बस व्यवस्थेची सोय केली.
 
               आता या मुलांना शाळेत दाखल केले खरे पण त्यानंतर प्रश्न मुख्य निर्माण झाला त्यांच्या वाहतूकीचा कारण कि, त्यांचे झोपडपट्टी हि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे पालक मुलं शाळेत पाठवायला तयार नव्हते. त्यावेळी त्यांनी स्वखर्चाने  आणि काही सामाजिक संस्थांच्या इतरांच्या सहकार्याने त्या मुलांना बसची व्यवस्था उपलब्ध करून दिली

 विद्यार्थी पालकांचे समुपदेशन...बालमित्र समूह

            त्यानंतर पण ती मुलं कधीतरी शाळेत जात नव्हती. असे समजल्यावर श्रीम अवघडे, इला गोरे तसेच जगदीश डंगर (बालरक्षक च्या धर्तीवर, बालमित्र समुह) हि सर्व बालमित्र समुहाचे सर्वजन त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी तसेच पालकांचे शिक्षणासाठी समुपदेशन केले. त्यामुळे हि मुल रोज शाळेत जाऊ लागले.अशाप्रकारे हि ३६ शाळाबाह्य 'मुलं' शिक्षणाच्या प्रवाहात येऊन 'विद्यार्थी' होऊन शिक्षणाचे धडे गिरवू लागले. हे काम करतांना अनेक समस्या आल्या पण सावित्रीमाईच्या लेकीने धीराने या प्रसंगांना सामोरे जात धीराने आणि नेटाने हे कार्य चालू ठेवले आहे आजही हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत


               डिजिटल शाळा..
ज्योती अवघडे यांनी त्यांची (याआधीची) रा.जि.प.शाळा गवळणवाडी केंद्र कामार्ली ता.पेण हि शाळा लोकवर्गणीतून डिजिटल केली आहे. तसेच शाळेत विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम पण राबविले आहेत. त्यांनी लोकवर्गणीतून तब्बल जवळपास ३ लक्ष रुपयांचा निधी जमा करून शाळेला भौतिक सुविधा तसेच तीन प्रोजेक्टर ,कॉम्प्युटर शाळेला उपलब्ध करून देऊन आदिवासी शाळेचा संपूर्ण कायापालट केलेला आहे. 

              शैक्षणिक बदली
  माणसाच्या आयुष्यात बदल हा महत्त्वाचा घटक आहे.अगदी त्याप्रमाणेच त्यांची बदली त्याच केंद्रातील वरवणे शाळेत झाली. तसेच त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या.

 २ विद्यार्थांचे कसे झाले २५ विद्यार्थी... संपूर्ण संघर्षमय प्रवास...

 संपूर्ण उन्हाळ्यातील सुट्टी याचसाठी
   ज्यावेळी माघील शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या चार दिवस आधी वरवणे शाळेचा पदभार घेतला,त्यावेळी शाळेच्या पटावर विद्यार्थी संख्या होती फक्त दोन...
  पुढे सुट्टीच्या कालावधीत पेन (जि. रायगड) शहरात त्यांना बसस्थानकात तसेच बाजारात काही मुलं भिक माघतांना तसेच फिरतांना आढळली. त्यावेळी सर्वांनी (बालमित्र समुह जगदीश डंगर, इला गोरे) त्या मुलांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित केले. पण त्यावेळी पालक मात्र तयार होत नव्हते कारण कि, पालकांचे म्हणणे होते की, आमच्या मुलांना कोणी जर विकले तर आम्ही काय करायचे. त्या पालकांचा फिरतीवरचा तसेच फुलांचे गजरे बनवून विकण्याचा व्यवसाय आहे. ते पालक दुसऱ्याला सुगंधित करतांना मात्र, आपल्या मुलांना फुलांच्या पाकळ्यांचाही गंध लागून देत नव्हते. म्हणजेच शाळेत पाठवायला तयार नव्हते. या ज्ञानज्योतीने, सावित्रीमाईच्या लेकीने मात्र हार न मानता नित्यनेमाने प्रयत्न चालूच ठेवले. शेवटी अनेकदा प्रयत्न करून त्यांच्या प्रयत्नांना यश आले व काही पालक व काही मुलं शाळेत येण्यासाठी तयार झाले... हे सर्व कार्य त्यांनी उन्हाळ्यातील संपूर्ण सुट्टीच्या कालावधीत केले.

 नवीन शाळा, नवीन विद्यार्थी, नवीन शैक्षणिक वर्षे, एका नव्या वर्षाची सुरुवात नव्या ध्येयासाठी

    नवीन शाळेत बदली झाल्यावर (शैक्षणिक वर्षे-2019-20) शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत गेल्यावर त्यांना फक्त दोन मुलं शाळेत दिसली. दुसऱ्याच दिवशी त्यांनी उन्हाळ्यातील सुट्टीत जमा केलेल्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी एकत्रितपणे बोलावले.  तेंव्हा ती मुलं आली, पण त्यावेळी  पालकांनी तसेच मुलांनी सांगितले की, " आम्ही फकस्त तुझ्याच शालेत येन, दुसऱ्या कणत्याही #शालेत येणार नव्हं" आता तर त्यांच्या समोर प्रश्नच निर्माण झाला की, हि मुलं जवळील शाळेत जायला अजिबात तयार नाहीत. कारण कि त्या मुलांना अवघडे मँडम यांचा खुपच लळा लागला होता...

 घरापासून 20 कि.मी.दूरच्या_शाळेत दाखल केले मुलं...

  संघर्षवादी माणसं सदैव सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून काम करत असतात. मोठ्या प्रयत्नाने मुलांना शाळेत येण्यासाठी तर केले पण, ती मुलं जवळच्या नगरपालिकेच्या शाळेत जायला अजिबात तयार नव्हते. ज्योती अवघडे यांची रा.जि.प. वरवणे शाळा हि शहरापासून जवळपास 20 कि. मी. आहे, आता त्यांच्या स्वतःच्या शाळेत त्यांनी त्या मुलांना प्रवेश दिला. पुढे चालून एकमेकांच्या सोबतीने त्या पालातील 12 मुलं शाळेत येण्यासाठी तयार झाली. त्या मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी सुरुवातीला स्वतः पैसे करून आठ दिवस शाळेत घेऊन गेल्या...

  शाळेत जाण्यासाठी_बसने लागणारे तिकीट बसचे पास काढून दिले..

   निसर्ग पण संघर्ष त्यांच्याच वाट्याला देतो, ज्यांच्याकडे तो सहन करणाची ताकद आहे. कारण कि इश्वराला पण माहिती आहे कि, हि व्यक्ती नक्कीच यामधून यशस्वीपणे मार्ग काढणार आहे. अगदी त्याचप्रमाणे मुलांना शाळेत दाखल केल्यानंतर एस.टी.आगारात त्यांच्या मोफत पासच्या संदर्भात त्यांनी मला विचारले असता, मी त्यांना सांगितले की, पास फक्त इयत्ता 5 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळत असतो. मग काय पुन्हा पाससाठी संघर्ष त्यावेळी मग त्यांनी बालमित्र समुहामध्ये सदर माहिती टाकली तेंव्हा जगदीश डंगर, इला गोरे, राजेश रसाल तसेच अजून इतरांनी त्या सर्वांच्या वार्षिक पासची वर्गणी गोळा करून पास काढले.


                दररोज मुलांच्याघरी जाने
   हि मुल दाखल केल्यानंतर आता हि मुलं रोज नित्यनेमाने शाळेत येत आहेत. पण तरीसुद्धा त्या मुलांच्या घरी जाऊन बसच्या वेळेत त्यांना घेऊन जावे लागते. अशाप्रकारे हि भिक मागणारे तसेच कुठेही भटकंती करणारी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य मा.सौ.ज्योती अवघडे मँडम करत आहेत.

   पुरस्कार : काम करण्यासाठी सदैव प्रेरणा देतात..

त्या घेत असलेल्याया शैक्षणिक भरारीची दखल घेत विविध प्रतिष्ठान, संस्था यांनी सन्मानित केले आहे. रायगड  जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांसह ,शासनाचा आदर्श शाळा आणि विविध 30 राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच सन 2021- 22 चा राज्यशासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे


               विविध प्रकारचे पद.

आंतरराष्ट्रीय इनर्व्हील क्लब च्या त्या आज अध्यक्ष म्हणून कामकाज पहात आहेत त्याचप्रमाणे दोन वर्षे सचिव म्हणून कामकाज त्यांनी केलेला आहे

सहसंपादक :
जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य सहसंपादीका,रायगड

                सन्मानार्थ सन्मान
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मीती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती येथे भूगोल विषय तज्ञ म्हणून कार्यरत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे येथे हिंदी विषय अभ्यास गटात तज्ञ सदस्य...


                         लेख
विविध लेख प्रसिद्ध झाले असून जीवन शिक्षण मासिक, जीवन गौरव तसेच शिक्षण आणि समाज या मासिकात त्यांचे लेख छापून आले आहेत , विविध यशोगाथा प्रसिद्ध झाल्या आहेत त्यामध्ये scert आणि युनिसेफ साठी कॉफी टेबल नवी पहाट मध्ये यशोगाथा प्रसिद्ध झाली आहे युनिसेफ ला दोन यशोगाथा बालरक्षक आणि कोरोना काळातील शिक्षण या यशोगाथा प्रसिद्ध झाल्या आहेत,
तसेच माजी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या फेसबुक पेजवर व युट्युबवर यशोगाथा प्रसिद्ध झाली आहे.

             घेतला वसा मी सावित्रीमाईचा..

प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे।।
या ज्ञानज्योतीच्या गगनभरारीस तेजोमय हार्दिक शुभेच्छा व  अभिनंदन...

नाव : सौ ज्योती दीपक अवघडे
शिक्षण : एम.ए.एम.एड
कार्यरत : रा.जि.प.प्राथमिक शाळा वरवणे केंद्र कामार्ली ता. पेण जि.रायगड
 ज्ञानज्योतीची संघर्षाची यशस्वी कहाणी...

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन