खोपोली येथील वीज कार्यालय नागरिकांसाठी डोकेदुखी
दुसऱ्या मजल्यावरील ऑफिस सोयीच्या जागी स्थलांतर न केल्यास आप करणार जन आंदोलन..
पाताळगंगा न्यूज : शेखर जांभळे
खोपोली : १७ ऑक्टोबर,
खोपोली नगरपालिका हद्दीत महावितरणचे कार्यालय सद्यस्थितीत जूने पोलीस स्टेशन जवळील लुईसा अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे.याठिकाणी तक्रारी व इतर कामासाठी येणारे आबाल वृद्ध ,गरोदर महिला तसेच आजारी असलेले नागरीक यांना जिना चढून आपल्या कार्यालयात येताना दमछाक होते शिवाय हे कार्यालयं राष्ट्रीय महामार्गावर असून येथे पार्किंगची सोय नसल्याने नागरिकांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागतोय.
या बिल्डिंगमधील इमारतीत मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याने श्वान दंशाची भीती सुद्धा आहे.महावितरण अधिकारी वर्गास अनेक वेळा विनंती करूनही या विषयावर दुर्लक्ष केले जात आहे. खोपोली शहर भागात नागरिकांना येणे सोयीचे होईल.अश्या ठिकाणी कार्यालय सुरू करावे अन्यर्थ आप नागरिकांच्या या समस्येबाबत आंदोलन करेल असे विनंती पत्र महावितरणच्या अधिकारी वर्गास दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी देण्यात आले.
महावितरण यावर तोडगा न काढल्यास आंदोलन छेडून नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी केले आहे.
0 Comments